मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत काव्या देशमुख राज्यात दुसरी
बेंबळे।प्रतिनिधी। फोटो
राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत तांबवे टें ता.माढा येथील इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या काव्या निलेश देशमुख हिने ३०० पैकी २९६ गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक मिळविला.'मंथन पब्लिकेशन’ आयोजित मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा ही इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्णपणे स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येते. परीक्षेत राज्यस्तरावर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येते.या परीक्षेमध्ये गणित मराठी, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी अशा प्रकारच्या विषयांमध्ये प्रश्न विचारण्यात येतात व राज्यातील मराठी, इंग्रजी, हिंदी या तिन्ही माध्यमातील विद्यार्थी ही परीक्षा देतात.काव्या ही आदर्श पब्लिक स्कूल,कुर्डूवाडीची विद्यार्थीनी असून तीला वर्गशिक्षिका सुरेखा कांबळे, आई सोनाली देशमुख, वडील निलेश देशमुख, तानाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे झारखंड राज्याच्या उद्योग विभागाचे संचालक आएएस अधिकारी रमेश घोलप, गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे,महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी आनंद जाधव, केंद्रप्रमुख सिमिंता कुंभार,आदर्श पब्लिक स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष अमोल सुरवसे,संचालिका पुजा सुरवसे,यशराज उद्योग समूहाचे अध्यक्ष गोरख खटके-पाटील,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,अरूण जगताप, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नागनाथ खटके, माजी सरपंच राजाभाऊ खटके, मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख,शशिकांत देशमुख, तडवळे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ परबत,सुभाष खटके,डॉ.बालाजी शिंदे, डॉ. संग्राम परबत, विकास अभिमान खटके,महेश देशमुख, स्वप्नील केमदारणे, शिवानंद बारबोले, दिनेश उरमोडे यांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा