Breaking

मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

रणजितसिंह शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यामुळे शेतकऱ्यात प्रचंड उत्साह व आत्मविश्वास.. विष्णू हुंबे याचे संचालक पद रद्द कराः गावात शांतता नांदेल...... गोविंद भोसले



रणजितसिंह शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यामुळे शेतकऱ्यात प्रचंड उत्साह व आत्मविश्वास
.. विष्णू हुंबे याचे संचालक पद रद्द कराः गावात शांतता नांदेल...... गोविंद भोसले


 बेंबळे ।प्रतिनिधी।              

      विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत सिंह भैया शिंदे यांनी बेंबळे गावी सलग दोन दिवस गाव भेट दौऱ्याचे नियोजन करून येथील नागरिकांच्या व्यथा , तक्रारी तसेच समस्या जाणून घेतल्या व यापुढे मी सर्व बाबीत स्वतः लक्ष घालून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे ठाम आश्वासन शेतकऱ्यांना दिले त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड आत्मविश्वास व उत्साह निर्माण झाला आहे .
         वृत्तांत असा की कोरोनामुळे दोन वर्ष व नंतर काही काळ प्रत्यक्ष नागरिकांच्या गाठीभेटी घेता आल्या नाहीत म्हणून सध्या रणजीत सिंह भैय्या शिंदे माढा विधानसभा मतदारसंघातून गाव भेट दौरा करून नागरिकांच्या वीज रस्ते पाणी व इतर काही समस्या जाणून घेऊन जागेवरच सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

       बेंबळे येथील विशेष वृत्त असे की विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा बेंबळे येथील , मागील अनेक वर्षापासून नियुक्त असलेला संचालक विष्णू हुंबे यांच्या मगरुर, हुकूमशाही व गर्विष्ठ वर्तनाचा सर्वत्र कहर झाला असून येथील शेतकरी अतोनात वैतागले आहेत .'माझ्यामुळे तुमचा ऊस गळीतास जातो, तुम्हाला पैसे मिळतात तुमचे प्रपंच चालतात ,करोडो रुपये उलाढालीच्या साखर कारखान्याचा मी 25 वर्षापासून संचालक आहे, सर्वांनी माझे ऐकलेच पाहिजे नाहीतर तुमचा ऊस जागेवर जाळीन, मीच बेंबळेचा आमदार, माझं ऐका नाहीतर एकेकांची वाट लावीन' ,शेतकऱ्यांना स्वतःच्या आवाक्यात आणण्यासाठी अशा धमक्या देण्याचे हुंबे याचे प्रकार मागील अनेक वर्षापासून चालू आहेत . कारखान्याचे चिट बॉय, ऍग्री ओव्हरसीयर यांना सतत धाकात ठेवले जाते, हुंबे सांगेल त्याचाच ऊस तोडायचा ,एखादी चालू ऊसतोड बंद करणे, वाहनाचे करार करताना घमेंडखोर वृत्तीचे प्रदर्शन करणे ,जाणून-बुजून कांहीजणांचे करार होऊ न देणे, कारखान्याची बाकी नसताना किंवा शेतकरी संबंधित व्यक्ती कोणाला जामीन नसताना केवळ खुनशी वृत्तीने त्याच्या ऊस बिलातून पैसे कपात  करावयास लावणे व त्या व्यक्तीला नाहक त्रास देणे, लोकांच्या वाटा अडवायला लावणे या व इतर अनेक प्रकारचा त्रास विष्णु हुंबे सतत देत असतो, त्यामुळे  शेतकरी बागायतदार अतिशय वैतागून गेलेले आहेत व इतर कारखान्यास ऊस देण्यासाठी प्रयत्न करत आहेत, व हुंबे च्या या वागण्यास बेंबळ्यातील 85 टक्के शेतकरी वैतागलेले आहेत. रणजीतसिंह भैय्यांच्या गाव भेट दौऱ्यात ठीक ठिकाणी अनेक बागायतदारांनी पुराव्यासहित  सर्व बाबी  दाखवून  दिल्या व अखेर अशा जुलमी संचालकाचे पद रद्द करण्यात यावे व बेंबळे गावास मोकळा श्वास घेऊ द्यावा म्हणजे सर्वत्रआनंद व समाधान  नांदेल अशी मागणी माजी सरपंच व भोसले पार्टीचे प्रमुख गोविंद भोसले यांनी बैठकीदरम्यान केली आहे, गोविंद भोसले यांच्या या मागणीला शेकडो बागायतदारांनी दुजोरा दिला आहे .यावेळी रणजीत शिंदे यांनी देखील प्रत्येक ठिकाणी संचालक विष्णू हुंबेच्या गैर वर्तणुकीची प्रचिती आल्याचे मान्य केले व मी तुमच्यासाठी सदैव उपलब्ध आहे, यापुढे अन्याय होऊ देणार नाही डायरेक्ट माझ्याशी संपर्कात रहा  काळजी करू नका यावर निश्चित तोडगा काढू असे ठाम आश्वासन दिले, यामुळे शेतकऱ्यांना हरवत चाललेला आत्मविश्वास पुन्हा मिळाल्यासारखे झाले आहे. 
                  दोन दिवसाच्या गाव भेट दौऱ्यात रणजीत सिंह शिंदे यांनी गोविंद भोसलेवस्ती , दत्ता लोंढे फाळके ,वांगधरे, तात्या पवार, काळे वस्ती, हुलगे वस्ती, बन वस्ती निंबाळकर , मिसाळ कदम नागटिळक कावळे या सर्व ठिकाणी भेटी देऊन नागरिकांशी सविस्तर चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या .तात्यासाहेब पवार यांचे फार्म हाऊसवर रणजीत शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला या ठिकाणी रणजीत भैय्यांनी दिलखुलास चर्चा करून आपले मनोगत व्यक्त केले. या दौऱ्याप्रसंगी कारखान्याचे संचालक पोपटराव चव्हाण रामभाऊ शिंदे संजय पवार कैलास भोसले भीमराव पवार सदाशिव भोसले यशवंत भोसले सिद्धेश्वर शिंदे मुकुंद रामदासी एकनाथ भोसले ब्रह्मदेव पवार खंडू नाना पवार हनुमंत भोसले समाधान भोसले दादा पवार माऊली पवार दत्ता भगत दादा भोसले अनिल सलगर सौदागर नागटिळक ॲग्री ओव्हरसीयर चिंतामणी चीट बॉय ढवळे खाडे चोपडे यांचे सह शेकडो नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा