लोकप्रिय शिक्षक व्यक्तिमत्व कल्याणराव अनपट सेवानिवृत्त ...
बेंबळे ।प्रतिनिधी।
हरीनगर बेंबळे येथील रहिवासी असलेले कल्याणराव हनुमंत अनपट हे आपल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षक सेवेनंतर निवृत्त होत आहेत. कल्याणराव अनपट हे शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व असून त्यांनी आपले बीएससी पर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्था पंढरपूर येथे तर बीएड पेठवडगाव कोल्हापूर येथून पूर्ण केले. पहिली तीन वर्षे ते राजाराम तळेकर विद्यालय जेऊर येथे कार्यरत होते नंतर 31 वर्ष भैरवनाथ विद्यालय आलेगाव बु।। येथे सहशिक्षक म्हणून सेवेत होते. विद्यादानाबरोबरच सामाजिक सेवेचीही त्यांना आवड असून कल्याणराव अनपट हे बेंबळे वि.का. सोसायटीचे अनेक वर्ष उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते ,सध्या ते माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सेवानिवृत्ती निमित्त भैरवनाथ विद्यालय आलेगाव येथे अनेक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक व्यक्तींच्या उपस्थितीत कल्याणराव अनपट यांना भव्य समारंभात सन्मानपूर्वक हृद्य निरोप देण्यात आला, याप्रसंगी अनेक मान्यवरांनी अनपट सर यांच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा