Breaking

शनिवार, २२ एप्रिल, २०२३

संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटीने अनेक लोकउपयोगी उपक्रम राबविल्याने शेतकरी महाविकास आघाडी विजयी करा -आमदार बबनदादा शिंदे .


संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटीने अनेक लोकउपयोगी उपक्रम राबविल्याने शेतकरी महाविकास आघाडी विजयी करा -आमदार बबनदादा शिंदे .


कन्हेरगांव दि प्रतिनिधी (राजेंद्र केदार )
 
बारा वर्षांपूर्वी  22 ते 25 लाख रुपयांची उलाढाल असलेल्या माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डूवाडी ची आज चार ते पाच कोटीची उलाढाल असून दोन कोटीच्या ठेवी आहेत, आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी , कुर्डूवाडी मोडनिंब  या ठिकाणी मार्केट यार्डात रस्ते ,पाणी, ड्रेनेज अशा महत्त्वाच्या सुधारणा करून उत्पन्न वाढवण्यासाठी गाळे बांधले, गोडाऊन, बाजार कट्टे इत्यादी सुधारणा घडवून आणल्या, व्यापाराची उलाढाल वाढली, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची योग्य प्रकारे विक्री व सोय होऊ लागली, आम्ही रांजणी पासून धानोऱ्यापर्यंत विकास कामे करून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करत आहोत ,भविष्यात तालुक्यातील प्रत्येक मार्केट यार्डात नवीन जागा घेणे, फळे व भाजीपाला मार्केट वाढवणे, कोल्ड स्टोरेज बांधणे ,केळी ,डाळिंब,द्राक्षे आदी फळांची ठेवण्याची व्यवस्था करणे, कार्यालय बांधणे व शेतकऱ्यांसाठी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. मार्केट कमिटी व इतरत्र विकास कामे करत असताना पारदर्शक व्यवहार होत आहेत व म्हणून जनतेने आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे व तो विश्वास आम्ही सार्थ करत आहोत, मार्केट कमिटी अडवणूक करून सेस घेत नाही भविष्यात तर सेस मागण्याची वेळही येणार नाही, बदलत्या परिस्थितीमुळे ज्वारी गव्हासारखे उत्पादन सध्या शेतकरी घेत नाहीत म्हणून काही ठिकाणी व्यवहार कमी होत आहेत ,शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शेतकरी महाविकास आघाडीस प्रचंड बहुमताने विजयी करा असे आव्हान आमदार बबनदादा शिंदे यांनी रांजणी येथील ओंकारेश्वर मंदिरात माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी केले 

आमदार बबनदादा शिंदे , आमदार संजयमामा शिंदे , जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ओंकारेश्वराला नारळ फोडून माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
       याप्रसंगी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन उबाळे , खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम उर्फ बंडूनाना ढवळे ,  मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील , जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील , भारत आबा शिंदे , माजी सभापती  संजय पाटील भिमानगरकर , आप्पासाहेब उबाळे , माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव माळी , धनंजय मोरे , नागनाथ खटके , सरपंच प्रमोद कुटे , रामभाऊ वाघमारे , चित्राताई वाघ , सरपंच बाळासाहेब ढेकणे ,संचालक शिवाजी डोके , प्रभाकर कुटे , संभाजी पाटील , राजकुमार पाटील , दिपक पाटील , जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, कारखान्याचे व बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते.
     यावेळी बोलताना आमदार संजयमामा शिंदे  म्हणाले की , मागील 25 ...30 वर्षात तमाम जनतेचे मोलाचे सहकार्य आम्हाला मिळाले व म्हणून आम्ही शिंदे घराण्याने विकास कामे करत असताना तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिलेला नाही हे सगळे दुनिया जाणते. मी माढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन नवीन उपक्रम स्वीकारले, प्रसंगी कर्ज काढली, त्याचा विनयोग योग्य प्रकारे केला, व्याजासह कर्ज फेडली त्यामुळे आज चार ते पाच कोटीची उलाढाल होत आहे,400 ते 500 ट्रक्स व हमाल यांना काम मिळाले आहे, मोडनिंब ,टेंभुर्णी कुर्डूवाडी येथे नवीन गाळे बांधले , कुर्डूवाडीत जागा विकत घेतली आहे, मोडनिंब मध्ये जागा भाड्याने घेणार आहोत, भविष्यात मार्केट कमिटीच्या मोठ्या विकासाला कोणीही अडवणार नाही, नकारात्मक प्रवृत्तीच्या विरोधकांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे त्यामुळे काळजीपूर्वक प्रयत्न करा व मोठ्या मताधिक्याने शेतकरी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा .
         याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत भैया शिंदे म्हणाले की , आजची लढाई ही सकारात्मक विरुद्ध नकारात्मक प्रवृत्तीची आहे विरोधक वाईट बोलतात, खोटे बोलतात, खोटे आरोप करतात त्यांच्या ह्या वाईट प्रवृत्तीला दूर करून विकासाची कामे पुढे नेण्यासाठी या निवडणुकीत सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यापुढे कांदा चाळ, कोल्ड स्टोरेज ,भाजीपाला मार्केट ,फळ फळांना मार्केट ही महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विरोधकांच्या टीकेला कामाच्या आणि मोठ्या मताधिक्याच्या विजयाच्या रूपाने आपण उत्तर देऊ. ही निवडणूक म्हणजे पुढील मोठ्या निवडणुकांची रंगीत तालीम आहे, म्हणून गावोगावी मतदारांना भेटून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करा, विरोधकांची बरीच मंडळी आपणाला फोनवरून तुम्हाला मतदान करतो असे सांगत आहेत, परंतु कोणीही गाफील राहू नका व विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे असे प्रचार कार्य करा. 
        याप्रसंगी कारखान्याचे संचालक वेताळा जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले, तुकाराम ढवळे , संतोष अनभुले , शिवाजीराव पाटील , भारत आबा शिंदे , संजय पाटील भिमानगरकर ,  सुहास  पाटील , वामन  उबाळे , प्रमोद कुटे यांनी  विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास तालुक्यातील गावोगाव चे सरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन व्यापारी हमाल तोलार व शेकडो कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.


 चौकट.

 उमेदवार सर्वश्री आमदार संजयमामा शिंदे , सुहास पाटील , रमेश पाटील , दिलीपराव भोसले , शिवाजी पाटील , उत्कर्ष देशमुख , किसन पाटील , अमोल देवकर , निकिता नागनाथ खटके , सुमन महादेव मोरे , विजयकुमार लोंढे , नागनाथ पाटील , पोपट दोभाडा , संतोष अनभुले , सतीश सुर्वे  ,सुरेश बागल  ,हनुमंत पाटोळे या सर्व उमेदवारांचा याप्रसंगी परिचय करून देण्यात आला.

--------------------

 चौकट.

काँग्रेसचे माजी आमदार धनाजीराव साठे यांनी काल आपल्या सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेतले त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो, आज राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच महाविकास आघाडीच्या तालुक्यातील काँग्रेस ,उबाठा सेना ,आरपीआय इत्यादी कार्य करत्याना आम्ही घाईगडबडीत आमंत्रित करू शकलो नाही, परंतु या पुढच्या प्रत्येक मेळाव्यात व प्रचारामध्ये ते सर्वजण आमच्याबरोबरच असतील हे निश्चित. तीस वर्षाच्या राजकारणात मी शिवाजी सावंत, विनायकराव पाटील, धनाजी साठे ,  भाई एस एम पाटील, धनंजय डिकोळे ,  प्रकाश गोरे , कल्याणराव काळे यांचे विरोधात निवडणुका लढवल्या पण निवडणुकीनंतर कोणीही कसलीही मनामध्ये कटुता ठेवली नाही. सध्याच्या विरोधी पुढाऱ्यांनी एवढी परंपरा जपली तरी देवाने त्यांना सुबुद्धी दिली व बरे झाले असे म्हणता येईल - आमदार बबनराव शिंदे
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जाधव व मुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीपराव भोसले यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा