शिंदे घराण्याने सर्वसामान्य जनतेचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी आत्मविश्वासाने प्रयत्न केले ..........आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे। प्रतिनिधी।
शिंदे घराण्याने मागील 30 वर्षात गरीब असो वा श्रीमंत असो प्रत्येकाच्या भल्यासाठीच विचार केला व विकास कामे केली म्हणून तमाम जनतेने आमच्यावर प्रचंड विश्वास दाखवला आहे व या विश्वासाला आम्ही पूर्वीही नाही आणि भविष्यात पुढेही कधीच तडा जाऊ देणार नाही, सर्वसामान्यांची आर्थिक उन्नती, प्रगती व भरभराट होणे हेच आमचे तत्व व ध्येय आहे व म्हणून सध्याच्या विरोधकांनी लादलेल्या कुर्डूवाडी मार्केट कमिटीच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करून विरोधकाचे डिपॉझिट राहणार नाही यासाठी जागृत रहा असे आव्हान आमदार बबनदादा शिंदे यांनी प्रतिष्ठा लॉन्स टेंभुर्णी येथे शेतकरी महाविकास आघाडीच्या प्रचार मेळाव्या दरम्यान केले आहे
.
सर्वप्रथम संचालक दिलीपराव भोसले यांनी स्वागत तर आदित्य जाधव यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील भारताबा शिंदे संजय पाटील भिमानगरकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम उर्फ बंडूनाना ढवळे सुहास पाटील जामगावकर शिवसेनेचे (उबाठा ) मधुकर देशमुख आरपीआयचे परमेश्वर खरात बाळासाहेब कोठारी रामदास खराडे अविनाश भोसले रामभाऊ शिंदे यांचे सह साखर कारखान्याचे सर्व संचालक व निवडणुकीतील सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार बबनदादा शिंदे पुढे म्हणाले की यापुढे कुर्डूवाडी मोडनिंब व टेंभुर्णी येथील मार्केट यार्डात शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त सुख सोयी उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. द्राक्ष डाळिंब केळी यांच्यासाठी मोठे हब तर भाजीपाला फळे यांच्यासाठी कोल्ड स्टोरेज निर्माण करण्यात येतील. जनावरांच्या बाजारात त्या त्या ठिकाणी पाणी व इतर सोयी उपलब्ध करण्यात येतील .पंधरा वर्षांपूर्वी 15 ते 20 लाख रुपयांची उलाढाल असलेली कुर्डुवाडी बाजार समिती आमदार संजय मामांच्या नेतृत्वामुळे आज पाच कोटी रुपये च्या पर्यंत उलाढाल करत आहे तर दोन कोटीच्या ठेवी ठेवले आहेत. गोडाऊन आणि गाळे यांच्या स्वरूपातून पैसा उभा केला जात आहे व मार्केट कमिटी मध्ये विविध सुधारणा केल्या जात आहेत. माढा तालुक्यातील रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण या सर्व सामान्य जनतेसाठी सोयी करण्याचे आम्ही कसोशीने प्रयत्न केले आहेत, वैयक्तिक अडचणी देखील प्रत्येकाच्या आम्ही सोडवलेल्या आहेत व यामुळेच धवल क्रांती हरित क्रांती व कृषी औद्योगिक क्रांती त झालेली आहे . आज प्रत्येक शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक जीवनमान उंचावलेले आहे व ती व्यक्ती सर्व सुखसुईचा उपभोग घेत आहे. या निवडणुकीत समजून घेऊन मतदान करा, जागृत राहून मतदान करा अन्यथा बाद मते होण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्या. विजय तर होणारच आहेत पण मताधिक्यात प्रचंड वाढ होईल याकडे लक्ष द्या.
याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे यांनी विरोधकांच्या टीकाटिपणीवर खरपूस समाचार घेऊन त्यांना यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असे स्पष्ट शब्दात सांगितले. या प्रचार सभेत संजय पाटील भीमा नगरकर शिवसेनेचे मधुकरराव देशमुख जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील तसेच सोमनाथ कदम सुहास काका पाटील अशोक खटके रामभाऊ थोरात प्रमोद कुटे संभाजी पाटील परमेश्वर खरात आदित्य जाधव आदी मान्यवरांनी आपले समयोचित विचार व्यक्त केले. या मेळाव्यास टेंभुर्णी बेंबळे कोंढार भाग परिसरातील गावागावातून सरपंच उपसरपंच सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीपराव भोसले यांनी मांडले
********************************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा