Breaking

रविवार, २३ एप्रिल, २०२३

श्रीगोंदा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवणुकीत कोणाला यश- अपयश सभासदांच्या व उमेदवारांच्या प्रतिक्रिया.... निवडून द्यावे ही सभासदांना विनंती.उमेदवार-दादासाहेब खेतमाळीस...


श्रीगोंदा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवणुकीत कोणाला यश- अपयश 

सभासदांच्या व उमेदवारांच्या प्रतिक्रिया....
 

श्रीगोंदा- नितीन रोही 


श्रीगोंदा शहरातील आणि परिसरातील शेतकरी सभासदांची श्रीगोंदा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा सध्या निवडणुकीचा डंका वाजत गाजत असल्याने सभासद थोडे नाराज असल्याचे जाणवते या निवणुकीसाठी श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनदादा पाचपुते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेद्र नागवडे, बाबासाहेब भोस हे तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली किसान क्रांती पॅनल उभा केला असून याचे नेतृत्व मा.चेअरमन अशोकराव आळेकर व भीमराव आनंदकर करीत असून दुसरा पॅनल तालुक्याचे राष्ट्रवादीचे मा. आमदार राहुल जगताप, घनशाम शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदीप औटी, राजू गोरे,विकास बोरूडे यांच्या नेतृत्वाखाली  शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी
 निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, त्याच प्रकारे यंदा ही पंचवार्षिक निवडणूक सन 2023 ते 2028 करिता श्रीगोंदा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित श्रीगोंदा या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन काही दिवस उलटले असून मंगळवारी 25 एप्रिला सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान आणि त्या नंतर मतमोजणी होणार आहे. सध्याची परिस्थिती पाहून नागवडे आणि पाचपुते एकत्र आल्यामुळे सध्याची परिस्थिती बिघडलेले चित्र दिसून येत आहेत,त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे,याचाच अर्थ की इथून मागच्या काळात जे सोसायटीचे संचालक होते तेच आता पुन्हा पुन्हा सोसायटी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे यंदाची सोसायटी निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असून यामध्ये शेतकरी विकास परिवर्तन पॅनल हा विजय होतोयकी काय हे पहाणे निकालानंतरच समजेल असे काही उमेदवार बोलताना दिसत आहेत.

चौकट

मी सुद्धा नगरसेवक झालो, सोसायटी चा व्हाईट चेअरमन झालो पण मी ऐके ऐक वेळेस झालो मी पुन्हा उमेदवारी केलेली नाही त्यामुळे माझेही मत आहे की तरुणांना व नवख्यांना संधी दिली पाहिजे-

मा.नगरसेवक-धनंजय दांडेकर...

चौकट

 या निवडणुकीमध्ये पाचपुते- नागवडे- भोस एकत्र आल्यामुळे आम्ही शेतकरी विकास परिवर्तन पॅनल निवडून देणार आहोत आम्ही कोणाच्याही दडपशाहीला भीत नाहीत पण नाव न छापण्याच्या अटीवर्ती एका सभासदांनी म्हटले आहे.

चौकट

शेतकरी विकास परिवर्तन पॅनल हा योग्य असून सभासदांच्या हिताचा व कामाचा आहे सभासदांनी संपूर्ण पॅनल निवडून दिला तर आम्ही सभासदांना विसरू शकत नाही व योग्य रीतीने कारभार संभाळू मगच पुढची निवडणूक लढवू- 

उमेदवार-हिरडे सखाराम बापू...


चौकट

किसान क्रांती पॅनल मध्ये दरवर्षी एक ते दोन उमेदवार बदली होतात बाकी तेच उमेदवार असतात त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की,यावर्षी शेतकरी विकास परिवर्तन पॅनला सभासदांनी निवडून द्यावा आणि एकदा सेवा करण्याची   उमेदवारांना संधी द्यावी

मा.नगरसेवक-दादासाहेब  औटी...

चौकट

सभासद माझ्यावरती व माझ्या सहकाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीच्या जोरावर नक्कीच आमच्या किसान क्रांती पॅनलच्या सर्व उमेदवारांना सभासद निवडून देणार आहेत यात काही शंका नाही. संस्था ही आमच्या सर्वांच्यामुळे खूप नफ्यात आहे व यंदा आम्हा सर्वांना निवडून दिले तर संस्थेची सुसज्ज अशी इमारत बांधणार आहोत.

मा- चेअरमन अशोकराव आळेकर...

चौकट

सध्या सोसायटीचे ऑफिस कुठे आहे व तेथून कसे कामे होतात हे सभासदांना ठाऊक आहे, आम्हाला सांगण्याचीही सभासदांना गरज नाही आम्ही आमच्या कार्यकाळात नवीन चांगली सुसज्ज इमारत बांधूच पण सभासदांचे कर्तव्यही तितकेच बजाऊ त्यामुळे सभासदांनी आमच्यावरती विश्वास ठेवून शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे ही सभासदांना विनंती.

उमेदवार-दादासाहेब खेतमाळीस...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा