माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आमदार बबनदादा शिंदे पॅनलचा रांजणी(देवाची) येथे आज शुक्रवारी सकाळी प्रचाराचा शुभारंभ ...
सर्वांनी उपस्थित राहावे ....आ. बबनदादांचे आव्हान
बेंबळे। प्रतिनिधी।
माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डूवाडी या सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त दादा- मामा- भैय्या शिंदे पॅनलच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी9.30 वाजता, रांजणी (देवाची) येथील ओंकारेश्वर मंदिरामध्ये होणार असल्याची माहिती शिंदेपॅनलचे प्रमुख आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे. या प्रचार शुभारंभासाठी माढा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य ,साखर कारखान्यांचे संचालक, गावोगावचे ग्रामपंचायत आणि सहकारी सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी तसेच दादा- मामा- भैय्या प्रेमी सर्व प्रतिष्ठित मान्यवर कार्यकर्ते या सर्वांनी सकाळी रांजणी देवाची येथे उपस्थित रहावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रमेश पाटील व तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा