Breaking

रविवार, ९ एप्रिल, २०२३

हाळदा सेवा सहकारी सोसायटीवर आमदार.श्यामसुंदर शिंदे समर्थकांचा दणदणीत विजय*



*हाळदा सेवा सहकारी सोसायटीवर आमदार.श्यामसुंदर शिंदे समर्थकांचा दणदणीत विजय*


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

कंधार : हाळदा येथील सेवा सहकारी सोसायटीवर लोहा कंधार मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या समर्थकांनी सोसायटीवर १३ पैकी १३ जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला आहे.
या निवडणुकीत रोहित रावसाहेब शिंदे ,चक्रधर बालाजी जळबा, ढोणे आत्माराम दत्तराम, दयापवाड व्यंकटी नारायण,बुरपले कमलकिशोर चंद्रराव,यलमिटवाड बळीराम श्रीराम, शिंदे दिगंबर व्यंकटराव, शिंदे शिवाजी किशन, शिंदे चौत्राबाई सुभाष, शिंदे भागवतबाई विक्रम, पवार रावसाहेब राजाराम, कुऱ्हाडे शिवराज गणपतराव, राठोड धनाजी हरीशचंद्र या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा