Breaking

मंगळवार, २५ एप्रिल, २०२३

राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत चैतन्य रविंद्र कवडे याने राज्यस्तरीय रौप्य तर संकेत शिंदे याने कांस्यपदक पटकावले



राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत चैतन्य रविंद्र कवडे याने राज्यस्तरीय रौप्य तर संकेत शिंदे याने कांस्यपदक  पटकावले
कन्हेरगाव(प्रतिनिधी)
            दि २० एप्रिल रोजी विभागीय क्रीडा संकुल मोशी रोड अमरावती येथे ' जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .सोलापूर जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव ओमप्रकाश पवार व सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये अकोले (खुर्द) ता . माढा येथील मा . बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ११ वी कला शाखेचा विद्यार्थी चैतन्य रविंद्र कवडे याने ८१ ते ९० कि .ग्रॅ वजन गटात राज्यस्तरीय रौप्य पदक पटकावले तर संकेत अरुण शिंदे इ . ८ वी ( क )याने ५० कि . ग्रॅ वजन गटात कांस्यपदक पदक पटकावले . या खेळाडुंना क्रीडाशिक्षक विजय माने, जोतिराम श्रीराम, बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले .
                या यशस्वी खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळा तालुक्याचे आमदार तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजयमामा शिंदे, जिल्हा दुध संघाचे चेअरमन रणजित भैय्या शिंदे,सभापती विक्रमदादा शिंदे,माढा वेल्फेअर फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धनराज दादा शिंदे,निमगाव(टें) गावचे सरपंच यशवंत भैय्या शिंदे, संस्थेचे सचिव तथा प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र ठोबरे सर, संभाजी पाटील, सरपंच प्रतिनिधी कांतिलाल नवले, स . रा . मोरे प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मधुरा सुरवसे, यशवंत प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका अर्चना नेवसे  तसेच प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा