Breaking

बुधवार, १७ मे, २०२३

*राजमुद्रा प्रतिष्ठान च्या वतीने 57 रक्तदात्यांचे रक्तदान*



*राजमुद्रा प्रतिष्ठान च्या वतीने 57 रक्तदात्यांचे रक्तदान*



टेंभुर्णी/ प्रतिनिधी
  राजमुद्रा प्रतिष्ठान चव्हाणवाडी(टें) यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ,जिजाऊ वंदना घेऊन संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने याही वर्षी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास राजमुद्रा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच चव्हाणवाडी पंचक्रोशीतील 57 शिवशंभुभक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असलेली निष्ठा दाखवली. याबद्दल राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व रक्तदात्यास प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
राजमुद्रा प्रतिष्ठान चव्हाणवाडी टें ही सामाजिक संस्था नेहमीच सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर असते. त्यामुळे राजमुद्रा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे चव्हाणवाडी  व पंचक्रोशीतील जनतेकडून नेहमीच कौतुकाची थाप व सहकार्य मिळते. त्यामुळे राजमुद्रा प्रतिष्ठानच्या सदस्यांना नवनवीन सामाजिक उपक्रम राबविण्यात प्रोत्साहन मिळत असते.
या सामाजिक कार्यासाठी मुक्ताई ब्लड बँक इंदापूर यांचे विशेष सहकार्य लाभले आणि डॉक्टर अविनाश ननवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राजमुद्रा प्रतिष्ठानचे कौतुक करून कधीही रक्ताची गरज पडल्यास सहकार्य करू असे आश्वासन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा