*विठ्ठलराव शिंदे भाग शाळा सापटणे (टे) या शाळेचा स्नेह मेळावा संपन्न*
टेंभुर्णी प्रतिनिधी कार्यक्रमाचे आयोजक :- सौ. वर्षा ढवळे - खटके पाटील , श्री. प्रशांत जगताप.
1998 -1999 ची दहावी बॅच विठ्ठलराव शिंदे प्रशाला निमगाव ( टे ) भाग शाळा सापटणे टे येथे कार्यक्रम संपन्न झाला. हा स्नेह मेळावा हा आमच्या शाळेचा पहिला मेळावा होता. आणि तो आमच्या बॅच ने खुप छान प्रकारे केला. आजी माजी शिक्षक व गुरुजी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंतीचे औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता.
सर्व गुरूजी व शिक्षक यांना आठवण म्हणून आम्ही राजमाता जिजाऊ यांचा फोटो फ्रेम सप्रेम भेट म्हणून दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पी. एस. तांबे प्राचार्य सर होते. माजी शिक्षक श्री. ढवळे आर. ए. सर, श्री. ढवळे ए. एस. सर, श्री. शिंदे डी. बी. सर, श्री. शिंदे ए. ए सर, श्री. पाटील ए. पी सर, श्री. नलवडे एस. एम, श्री. एच. एन. ढवळे सर, श्री. काळे सर, श्री. चट्टे सर, श्री. घाडगे वैजनाथ (मामा) जि. प. माजी गुरुजी साळुंखे एस. व्ही., श्री पाटील गुरूजी, श्री. पोतदार गुरूजी, सौ. सूरवसे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला व शाळेच्या बांधकामासाठी ५१०००/- रुपये देणगी देण्यात आली.
सूत्रसंचालन - प्रशांत जगताप यांनी केले. अनुवाद सौ. वर्षा ढवळे खटके पाटील यांनी केले.
या वेळी उपस्थित माजी विदयार्थी - प्रशांत जगताप, अजित जोशी, तात्या जगताप, रामदास ढवळे, सुनिल थोरात, अनिल थोरात, धनाजी खंडे, दादा गायकवाड, राजाराम वाफळकर, गजेंद्र ढवळे, विजय खंडाळे, विवेक भुजबळ, भाऊ थोरात, वर्षा ढवळे-खटके, उर्मिला कोरडे, अनिता तनपुरे, निलावती तनपुरे, सुनिता थोरात, सुनिता ढवळे, प्रातिभा पाटील, रसिका कोरडे, सुरुची पाटील, इताज मुलाणी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा