*श्री तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या ड्रेसकोडबद्दल मंदिर संस्थान मार्फत घेण्यात आलेल्या निर्णयाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी राहुल खपले यांचे तहसीलदार यांना निवेदन*
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या ड्रेसकोड बद्दल दिनांक 18/05/2023 रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मार्फत निर्बंध घातल्याचे आदेश काढण्यात आले होते त्या अनुषंगाने लाहान मुलांनाही मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता त्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर संबंधीत भाविकांनी दुरचित्रवाणीच्या माध्यमासमोर त्यांचे वक्तव्य केले त्यामुळे त्याची वाच्यता झाल्याने मंदिर संस्थान तुळजापूर यांनी गुरवार दिनांक 18/05/2023 रोजी जाहीर प्रगटन करून आदेश मागे घेतल्याचे प्रसिध्द करुन भाविकांच्या लहान मुलाची ड्रेसकोडच्या नावाखाली अडवणुक झाली यासंदर्भात तुळजाभवानी मंदिर समितीकडुन तसा कोणताही निर्णय झालाच नाही असे सांगण्यात आले, परंतु सदर कालावधीत तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांना सुखावह दर्शन घेवुन परत जाण्याऐवजी काहीजनाना अडवणुकीमुळे वादास सामोरे जावे लागले.
घडलेला प्रकार भाविकांच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक आहे. सदरचे ड्रेसकोड बंदी बाबतचे बोर्ड मंदिर समितीमार्फत लावण्यात आले की दुसरे कोणी लावले या बाबत खरे सुत्रधार कोण आहेत याची चौकशी व्हावी. राज्यातील सर्व दृश्य माध्यमावर दिवसभर तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोड बाबतची बातमी चालु होती सदर प्रकरणामुळे तुळजाभवानी देवस्थान समितीबाबत राज्यात गेलेला संदेश चांगल्या प्रकारे गेलेला नाही. तुळजाभवानी मंदिराच्या ड्रेसकोड वरुन विनाकारण चुकीच्या वलगना झाल्या आहेत. मंदिराची प्रतिष्ठा जपण्यात प्रशासनाकडुन हजगर्जीपणा झाला का? तसेच या सर्व प्रकारच्या पाठीमागे कोणाचे हात आहेत या सर्व प्रकाराची चौकशी होवुन संबंधीतावर कठोर कायदेशीर कार्यवाही व्हावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे,या निवेदनावर भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे व माजी नगरसेवक राहुल खपले यांची स्वाक्षरी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा