Breaking

बुधवार, १७ मे, २०२३

सोलापूरल जिल्ह्यात अमूल दूध संकलन ॲानलाईन केंद्र गांवा- गावात सुरू करणार.... अभिजीत भय्या तांबीले



सोलापूरल जिल्ह्यात अमूल दूध संकलन ॲानलाईन केंद्र गांवा- गावात सुरू करणार.... अभिजीत भय्या तांबीले

माढा माळशिरस व करमाळा तालूक्या मधील शेतकरी वर्गाला आव्हान


टेंभुर्णी प्रतिनिधी/ सध्या दूध व्यवसाय मध्ये कॉम्पिटिशन लागले असून अनेक दुध संघ दुधाला भाव जाहीर करतात व देताना वेगळा देतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधामध्ये एक ते दोन रुपयांनी फटका बसत असून याचाच आम्ही विचार करून इतर संस्थांपेक्षा दोन रुपये ज्यादा दर देण्याचा निर्णय घेतला असून यापुढे आता सोलापूर जिल्ह्यातील माढा करमाळा माळशिरस तालुक्यामध्ये आम्ही ऑनलाईन संस्था चालू करून सर्वात जास्त दर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नुकतेच पुणे जिल्ह्याचे जि. प .सदस्य अभिजीत भय्या तांबिले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली.


खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. आणंद संचलित अमूल गाय दूध फॅट ३.५ आणि एस एन एफ ८.५ चा शेतकरी दर  ३७ रू  तर म्हैस दूध फॅट ६.० आणि एस एन एफ ९.० चा शेतकरी दर ५०.३० रू आहे. यामुळे बाकीच्या दूध संघाचा गाय दूधाची फॅट ३.५ आणि एस एन एफ ८.५ सध्याचा दर ३५ रूपये असल्याने अमूल डेअरीला शेतकऱ्यांनी दूध घातले तर पर लिटरला २ रूपये दर जास्त मिळणार आहे तसेच शेतकऱ्यांना जशी गाय दूधाची पर पॅाइंट गुणवत्ता वाढेल त्या प्रमाणे ४७ पैसे वाढ मिळत असल्याने अमूलला शेतकरी वर्गाने दूध घातल्याने नक्कीच फायदा हा होणार आहे आणि म्हैस दूधाला पर पॅाइंट गुणवत्तेस ७० पैसे वाढ मिळत असल्याने साधारण शेतकर्यांना रोजचा ॲवरेज रेट काढला तर गाय ४० ते ४२ रूपये तर म्हैस दूधाला ६५ रूपये ते ८५ रूपये पर्यंत साधारण पर लिटरला दर बसत आहे यामुळे शेतकरी वर्गाला जशी दुधाची गुणवत्ता तसा दूधाचा दर अमूल मध्ये मिळत असल्याने शेतकरी समाधानी झाल्या शिवाय राहत नाही.

अमूल शेतकरी पेमेंट व फॅट , एस एन एफ व लिटर घेण्याची पध्दत पूर्ण ॲानलाईन सिस्टम असल्याने तसेच डायरेक्ट शेतर्यांच्या बॅंक खात्यावर पेमेंट असल्याने पूर्ण पारदर्शकता अमूल मध्ये आहे.भविष्यात बाकीच्या दूध संघांचे दर आजून जरी कमी झाले तरी अमूल दर कमी करणाच्या मार्गांवर असेल असे आम्हाला वाटत नाही..तरी माढा माळशिरस व करमाळा तालूक्या मधील शेतकरी वर्गाला कोणाला अमूल दूध संकलन ॲानलाईन केंद्र गांवा गावात सुरू करायचे असतील किंवा दूध उत्पादकांना दूध घालण्यास सुरू करायचे असेल तर खालिल मोबाईल नंबर वर संपर्क करून अमूलला शेतकरी वर्गाने सेवा करण्यास संधी उपलब्ध करून द्यावी

 अशी माहीती पुणे जिल्हा परिषद सदस्य , अभिजीत भैय्या तांबिले यांनी दिली.

अतुल चौधरी , संकलन अधिकारी
मो.न.878-8579567
अभिजीत तांबिले , पुणे जि.प.सदस्य 
मो.न. 9764665555

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा