*झरेगांवकर महाराज करणार महाराष्ट्राभर कारागृहातील कैद्यांसाठी कीर्तना प्रवचनातुन प्रबोधनं*
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
वारकरी आचारसंहिता परिषदेचे मुख्य प्रवर्तक ह.भ.प.श्री झरेगांवकर महाराज यांचे सध्या वारकरी सांप्रदायाच्या मुख्य प्रवाहात मोठे कार्य सुरू आहे.
झरेगांवकर महाराज आपल्या स्पष्टवक्तेपणा, आणि निर्भिडपणामुळे वारकरी सांप्रदायात प्रसिद्ध आहेत.तसेच ते कीर्तनात खाकी फेटा बांधतात म्हणून पोलीस प्रशासनातही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
येणार्या काळात ते महाराष्ट्रातील सर्व मध्यवर्ती कारागृहात जेलच्या कैद्यांना कीर्तन ,प्रवचनाच्या माध्यामातून चांगले आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
त्यासाठी त्यांनी आज आय.पी.एस अधिकारी मा.श्री संदिप कर्णिक सह पोलीस आयुक्त यांची पुणे येथे भेट घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा