Breaking

मंगळवार, २ मे, २०२३

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा सोलापूर रोटरी रुलर कॉप्स व रोटरी क्लब टेंभुर्णी यांचे कडून सन्मान.ऑपरेशन परिवर्तनाची राष्ट्रीय स्तरावर दखल पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांचे हस्ते मिळाला राष्ट्रीय सेवा पुरस्कार.



पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा सोलापूर रोटरी रुलर कॉप्स व रोटरी क्लब टेंभुर्णी यांचे कडून सन्मान.

ऑपरेशन परिवर्तनाची राष्ट्रीय स्तरावर दखल पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांचे हस्ते मिळाला राष्ट्रीय सेवा पुरस्कार.


टेंभुर्णी(प्रतिनिधी):- रोटरी सोलापूर रुरल कॉप्स व रोटरी क्लब टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक सोलापूर यांचा सन्मान सोहळा रोटरी हॉल टेंभुर्णी (ता.माढा) येथे आयोजित करण्यात आला. सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या ऑपरेशन परिवर्तनाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली नवी दिल्ली येथील. विज्ञान भवन येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते मिळाला त्याबद्दल  रोटरी  कडून सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक  शिरीष सरदेशपांडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.  त्चयावेळी पुणे जिल्हा एटीएस चे अधीक्षक तुषार दोशी हेही आवर्जून उपस्थित होते यावेळी  रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या 2025-26 च्या प्रांतपाल पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल रो.सुधीर लातूरे ,मार्केट कमिटी च्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल रमेश पाटील व रोटरी सोलापूर रुरल कॉप्सचे अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल यशवंत हांडे  व सचिव नितीन कुदळे यांचा  सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी केले.
या वेळी बोलताना 
शिरीष सरदेशपांडे म्हणाले हा पुरस्कार ऑपरेशन परिवर्तन मधून मिळाला आहे, यांचे श्रेय हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ातील सर्व पोलीस प्रशासनाचे आहे. सोलापूर जिल्हा हा भौगोलिकदृष्टय़ा राज्यातील पहिल्या चार मध्ये आहे. 2400 पोलीस उपलब्ध आहेत येवढ्या संख्या बळावर पोलीस प्रशासन काम करत आहे तसेच 
पारंपरिक पद्धतीने हातभट्टी दारूचे उत्पादन होते त्या ठिकाणी छापे टाकले परंतु यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. केंद्रीय पथकाने यांचे निरीक्षण केले अणि त्याचे यश पाहून सदरचा पुरस्कार मिळाला.
हा उपक्रम राबविण्यासाठी एस.पी पासून पोलिस यांनी सर्वांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे 
हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण सोलापूर पोलीस दलाचा सन्मान आहे असे मत त्यांनी व्यक्त केले या वेळी 
  रो.डॉ ओमप्रकाश मोतीपवळे, सुधीर लातूरे, प्रांतपाल रुकमेश जाखोटिया यांनीही आपले विचार मांडले.  रो.डॉ ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या पुढाकाराने टेंभुर्णी परिसरातील श्रीक्षेत्र रांजणी येथे एक हजार प्रति तास क्षमता असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची  जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन ही पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे व पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक एटीएस तुषार जोशी यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासा पत्रकार डी एस गायकवाड सर आबासाहेब साळुंखे ,सतीश काळे, धनंजय मोरे व. रोटरी क्लब अकलूज चे. नितीन कुदळे, श्री शेंडगे ए जी प्रवीण कारंडे सांगोला रोटरी क्लबचे  हमीद भाई तांबोळी मधुकर कांबळे व त्यांचे सर्व सहकारी कुर्डूवाडी क्लबचे डॉ. रवींद्र बोबडे मोडलिंब क्लबचे प्रशांत कोल्हे व त्यांची सहकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टेंभुर्णी रोटरी चे यशवंत हांडे ,रोटरी क्लबचे सचिव किशोर सलगर, रमेश पाटील, वैभव गांधी, श्रीकांत लोंढे, शब्बीर जहागीरदार, रणजित बोत्रे, महेश कोठारी, योगेश भणगे, संदीप मांजरे, प्रशांत गांधी,  महेश कोकीळ, तन्वीर मुलानी, अनिल बाबर, मुकुंद आटकळे, विरांग मेथा, पारस कटारिया,अविनाश देशमुख ,बाळासाहेब सपाटे उमेश रवळ यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन संदीप मोकाशी यांनी तर आभार सचिन होदाडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा