Breaking

मंगळवार, २ मे, २०२३

गौतमी पाटिल उद्या श्रीगोंद्यात..लहुजी समाज सेवा मंडळाचा विशेष उपक्रम..!




गौतमी पाटिल उद्या श्रीगोंद्यात..
लहुजी समाज सेवा मंडळाचा विशेष उपक्रम..!



 श्रीगोंदा: नितीन रोही 

महाराष्ट्रातील तमाम लावणी प्रेमींना आपल्या तालावर थिरकवणारी लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटिल हिचा लावणी महोत्सव व आर्केस्ट्राचा कार्यक्रम श्रीगोंदा शहरातील पारगाव रोडला उद्या दिनांक ३ मे २०२३ रोजी सायंकाळी ७:०० वाजता आयोजीत करण्यात आला आहे.
अशी माहिती भगवान गोरखे आणि ज्येष्ठ पत्रकार मीराताई शिंदे यांनी दिली आहे. 

 सदरील कार्यक्रम  हा सामजिक भावनेतून  असुन, यातुन विधायक कार्य पुर्ण करण्यात येणार आहे. मागासर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येत असुन, त्यासाठी लागणाऱ्या निधीच्या पूर्तर्तेसाठी नमूद कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. लहुजी समाज सेवा मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोकांनी केले आहे.

भगवान आबा गोरखे यांनी सांगीतले की, सदरील कार्यक्रम अतिशय नियोजपूर्वक व शांततेत पूर्ण होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासकिय परवानग्या पुर्ण करण्यात आल्या आहेत. आणि चोख बंदोबस्ता बरोबरच बोंसरच्या माध्यमातून कार्यक्रमाला कोठेही गालबोट लागू नये याची खबरदारी घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा महिलांना ही आनंद घेता यावा यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

या  नमूद   कार्यक्रमाचा ५००/-, ३००/-, २००/- रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला असून, भगवान गोरखे, मीराताई शिंदे, मुकूंद सोनटक्के, सत्यवान शिंदे व प्रशांत शिंदे यांच्याशी तिकीट व इतर मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन आयोजक-भगवान गोरखे, मीराताई शिंदे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा