Breaking

बुधवार, २४ मे, २०२३

नव्या संसदेला संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावेऑल इंडिया पँथरसेनेच्या वतीने तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी


नव्या संसदेला संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे


ऑल इंडिया पँथरसेनेच्या वतीने तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी.,


श्रीगोंदा- नितीन रोही

श्रीगोंदा तालुक्यातील ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने श्रीगोंदा तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले .या निवेदनात नव्या संसदेला संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे तसेच २८ मे २०२३ रोजी होणारे  नव्या संसदेचे उद्घाटन रद्द करून ते संविधान दिनी २६ नोव्हेंबर रोजी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.ऑल इंडिया पँथर सेना च्या माध्यमातून 
नव्या संसदेला नाव देण्याचा लढा व्यापक करून देशव्यापी केला जाईल.असे निवेदनात नमूद केले आहे.
 यावेळी अमर घोडके (जिल्हा उपाध्यक्ष,नगर),संजय रणसिंग (तालुका अध्यक्ष),योगेश गंगावाने(ग्रा.ता.अध्यक्ष),नितिन शिंदे(ता.युवा अध्यक्ष),अक्षय आठवले(ता.संघटक),सुभास रणसिंग,रुतीक रणसिंग आणि ऑल इंडिया पँथर सेनेंचे कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा