*आर्या कॉलेजचा सलग पाचव्या वर्षी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के*
माढा तालुक्यातील श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ निमगांव (टें) संचलित,आर्या ज्युनिअर कॉलेज पिंपळनेर या कॉलेजचा माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च -२०२३ च्या बारावी परीक्षेचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून कॉलेजमधील विद्यार्थिनी गीतांजली उमेश शिंदे हिने ८९.८३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक तर सायली सुनील वीर हिने ८८.०० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर पूनम सुग्रीव ढवळे हिने ८७.६७ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक तर काझी अब्दुलमोईद शहाजहान ह्याने ८७.३३ टक्के गुण प्राप्त करून चतुर्थ क्रमांक तर ऋतुजा प्रमोद शिंदे हिने ८७ टक्के गुण प्राप्त करून पाचवा क्रमांक पटकावला.कॉलेजमधील २९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उज्जवल यश संपादन केले.
या यशाबद्दल आमदार बबनदादा शिंदे,आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा दूधसंघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे,सभापती विक्रमसिंह शिंदे,पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रणिता शिंदे,प्राचार्य रवींद्र लोखंडे,उपप्राचार्य अन्वर मुलाणी,ज्युनिअर कॉलेज प्राचार्य रणजितकुमार उबाळे,राजेंद्र मारकड, दादासाहेब अधटराव,सचिन पवार,राहुल सोमासे, हर्षद शिंदे,शोएब शेख,स्मिता पाटील,प्रशांत केदार,अनिल दोरकर,गोपीनाथ शिंदे,कुमार बडे, सतिश वरपे,पालकवर्ग,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा