Breaking

सोमवार, ८ मे, २०२३

धाराशिव येथे भारतीय जनता युवा मोर्चाची जिल्हा नियोजन व आढावा बैठक संपन्न.



धाराशिव येथे भारतीय जनता युवा मोर्चाची जिल्हा नियोजन व आढावा बैठक संपन्न.



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.


      भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा दिनांक 11 मे 2023 रोजी धाराशिव जिल्हा दौरा आहे. या दौऱ्याच्या पूर्वतयारी साठीची आढावा बैठक भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान भवन,भाजपा कार्यालय धाराशिव या ठिकाणी संपन्न झाली.
      या बैठकीत भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी  आपल्या भाषणात सांगितले की,युवा मोर्चाच्या माध्यमातून अनेक युवकांना जोडून जिल्हाभरात पक्ष वाढीसाठी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तसेच अनेक युवकांना मुख्य प्रवाहात आणून भाजप व पंतप्रधान नरेंद्र जी मोदी व उपमुख्यमंत्रि  देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्य त्याचबरोबर नवीन युवकांना आजचा असलेला नवभारत व भ्रष्ट महाविकास आघाडी मुक्त  महाराष्ट्र यावर परखड 
मत मांडले , प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नियोजित दौऱ्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शेकडो युवकांच्या सोबतीने धाराशिव शहरांमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच बाईक रॅली पार पडल्यानंतर 18 ते 25 वयोगटातील युवकांची फळी तयार करून युवा वॉरियर्स शाखा उघडण्यात येणार आहेत.या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून अनेक तरुणांनी सहभागी होण्यासाठीचे आव्हान देखील त्यांनी आपल्या भाषणात केले.
     याप्रसंगी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलले महाराष्ट्र राज्यामध्ये धाराशिव जिल्हा युवा मोर्चाचे उल्लेखनीय कार्य आहे,प्रदेश व स्थानिक कार्यक्रमांमध्ये धाराशिव जिल्हा पुढे आहे तसेच धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे कौतुक देखील त्यांनी यावेळी केले व त्यानंतर प्रत्येकाने आपली जबाबदारी लक्षात घेऊन पक्ष वाढीसाठी कार्य करणे अपेक्षित आहे असे सांगितले त्यामध्ये 18 ते 25 वयोगटातील तरुणांना सोबत घेऊन त्यांच्यासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणे ,सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे सामाजिक कार्य व विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे ,तसेच ज्या कार्यकर्त्याची काम करण्याची तळमळ आहे अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.तसेच आमदार राणाजगजिसिंह पाटील साहेब यांच्या बूथ तेथे युवा वॉरियर्स शाखा या संकल्पनेचे कौतुक केले.हा धाराशिव पॅटर्न राज्यभरात राबवणार असल्याचे सांगितले, युवा मोर्चाच्या वतीने राबवण्यात येणारे फ्री मॉक टेस्टसिरीज  -jee -Neet -MHT-CET CHA चा लाभ ज्यास्तीत ज्यास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले ,
   यावेळी नव्याने कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये निवडून आलेले युवा मोर्चाचे सहकारी रोहन जाधव ,अमर पडवळ ,आशिष सोनटक्के ,राहुल शिंदे व नवनियुक्त प्र का स मकरंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
    या बैठकीत मराठवाडा समन्वयक अरुण पाठक व जिल्हा प्रभारी अमोल निडवदे यांनीही मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन आत्मनिर्भर संयोजक सचिन लोंढे यांनी केले तर आभार भाजप जिल्हाउपाध्यक्ष इंद्रजित देवकते यांनी मांडले ,
       या प्रसंगी प्रदेश सचिव दत्ता चेवले, सोशल मीडिया प्रमुख पाण्डुअण्णा पवार ,माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, शहराध्यक्ष राहुल काकडे, तालुकाध्यक्ष आनंद कंदले, विनोद निंबाळकर ,संदीप इंगळे ,रोहित देशमुख ,प्रशांत लोमटे ,शुभम साठे ,भाऊसाहेब कुटे ,जिल्हाउपाध्यक्ष प्रवीण घुले,अमित कदम ,पृथ्वी दंडनाईक ,सरचिटणीस गणेश देशमुख,गणेश इंगळगी ,गणेश एडके ,विद्यार्थी संयोजक विशाल पाटील ,पूजा देडे ,सोशल मीडिया संयोजक बालाजी जाधव ,निलेश दिवाने ,प्रसाद मुंडे ,यांच्या सह युवा मोर्चा तालुका ,शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा