Breaking

गुरुवार, ४ मे, २०२३

श्री तुळजा भवानी भोपे पुजारी मंडळ तुळजापूर यांचा मराठा वनवास यात्रेस जाहिर पाठिंबा*



*श्री तुळजा भवानी भोपे पुजारी मंडळ तुळजापूर यांचा मराठा वनवास यात्रेस जाहिर पाठिंबा*


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

तुळजापूर :-दि.०६ मे २०२३ ते दि.०६ जून २०२३ रोजी मराठा समाजास ५०% मधील ओबीसी मधून आरक्षण मिळविण्याकरीता "वनवास यात्रा"चे सकल मराठा समाजातर्फे आयोजन करण्यात आलेले आहे.श्रीक्षेत्र तुळजापूर ते मुंबई ही यात्रा संपुर्ण महिनाभर मराठा समाजात जनजागृती करत निघणार आहे.या यात्रेची सुरूवात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेची यथासांग पुजाअर्चा करून सर्व भोपे पुजारी हे आयोजकांना शुभार्शिवाद यात्रेची सुरूवात करणार आहेत.तरी सर्व भोपे पुजारी यांनी सकाळी ९ वाजता श्री तुळजा भवानी मंदिरात वेळेवरती उपस्थिती द्यावी हि विनंती.श्रीक्षेत्र तुळजापूरातील सर्व जातीधर्मातील मित्रपरिवार तसेच देविचे मुख्य भोपे पुजारी सदस्य हे मराठा जातीला आरक्षण मिळविण्यासाठी आयोजकास सर्वतोपरी सहकार्य करतील धन्यवाद.
                   आपला विश्वासू
                *अमरराजे कदम परमेश्वर*
*अध्यक्ष श्री तु.भ.भोपे पुजारी मंडळ तुळजापूर.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा