Breaking

बुधवार, ३१ मे, २०२३

कन्हेरगांव येथीलसुकेशनी कदम व तृप्ती हांडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित.



कन्हेरगांव येथील
सुकेशनी कदम व तृप्ती हांडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित.


कन्हेरगांव दि प्रतिनिधी

कन्हेरगांव तालुका माढा येथील सुकेशनी अरुण कदम व तृप्ती कोंडीबा हांडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला .
      कन्हेरगांव तालुका माढा येथे ३१ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार 2023- 24 हा कन्हेरगांव तालुका माढा येथील सुकेशनी अरुण कदम व तृप्ती कोंडीबा हांडे यांना 
 प्रशस्तीपत्र , ट्रॉफी , पुष्पहार , शाल व पाचशे रुपये देऊन हा सन्मान करण्यात आला. 
       सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
    यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय मोरे , माजी सरपंच मनीषा चव्हाण , माजी उपसरपंच दिपक डोके , ग्रामसेवक शिंदे , कोंडीबा हांडे , भारत पाटील , दिगंबर डोके , अंकुश मोरे , आबासाहेब डोके , बापू कदम , विशाल पवार यांच्यासह मोहिनी डोके , कांचन डोके , राणी डोके , नंदाताई डोके , संगीता डोके , सिंधू डोके , मंदाताई शिंदे , संगीत जाधव , शोभा शिंदे , रेखा डोके , लक्ष्मी जाधव , अर्चना डोके , वैशाली शिंदे , संगीता शिंदे , सीता डोके , रूपाली डोके , अंगणवाडी सेविका मंदाकिनी केदार , वैशाली माने , अलका चव्हाण , रेखा मस्के , संगीता डोके , आशा वर्कर आशा चव्हाण, सीमा लोखंडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . 
      यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय मोरे , सुकेशनी कदम , तृप्ती हांडे ग्रामसेवक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

सुकेशनी कदम व तृप्ती हांडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करताना मनिषा चव्हाण  , धनंजय मोरे ,  ग्रामसेवक शिंदे  व महिला मोठ्या संख्येने दिसत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा