केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची कृष्णा जेनेरिक मेडिकल ला भेट.
कन्हेरगांव दि प्रतिनिधी
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी टेंभुर्णी तालुका माढा येथील कृष्णा जेनेरिक मेडिकल येथे भेट देत जेनेरिक औषधा विषयी अडचणी , समस्या व उपायोजना याविषयी सविस्तर चर्चा केली. कृष्णा मेडिकलचे फार्मासिस्ट सुहास खोचरे , फार्मासिस्ट स्वाती खोचरे यांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना जेनेरिक मेडिकल विषयी येणाऱ्या अडचणी निवेदनाद्वारे देत मांडल्या. प्रारंभी हरितक्रांती पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन किसनराव खोचरे यांनी केंद्रीय मंत्री मिश्रा यांचे स्वागत केले.
यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , आमदार प्रशांत परिचारक , माढा तालुका भाजपचे अध्यक्ष योगेश बोबडे , जेनेरिक काटचे जिल्हाप्रमुख सतीश भोरे ( बार्शी.) , हरित क्रांती पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन किसनराव खोचरे , हेमलता खोचरे , सुहास खोचरे , स्वाती खोचरे , अमित खोचरे , शिवराज खोचरे , फार्मासिस्ट सरिता काशीद , अकोले खुर्द चे सचिन पाटील , अरुण पाटील पंडित पाटील , शिवाजी पाटील , महेश माने , बाबुराव डोके , विकास पाटील , प्रवीण खोचरे , हर्षवर्धन माने , तुषार काशीद , बालाजी खोचरे , सौरभ माने , काका सरडे , अभिजीत माने , किरण खोचरे , अभिजीत खोचरे , उमेश पाटील , सुधीर डोके ,राजेंद्र डोके , बालाजी डोके , अशोक लांडगे , महादेव डोके , बिलाल देशमुख , इरफान मुलानी , प्रशांत शिरसागर आदी उपस्थित होते.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी कृष्णा जेनेरिक मेडिकल येथील सविस्तर चर्चा करताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जेनेरिक औषधे सर्वसामान्यापर्यंत तळागाळापर्यंत उपस्थित का नाही त्यावर काय अडचण येत आहेत त्या संदर्भात सविस्तर चर्चा केली.
त्यावर फार्मासिस्ट सुहास खोचरे यांनी जिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय , अंगणवाडी सेविका , आशा वर्कर यांच्या माध्यमातून जेनेरिक औषधांची माहिती सर्व खेडेपाड्यात पोहोचवावी अशी विनंती वजा अपेक्षा मंत्री महोदय यांच्याकडे व्यक्त केली.
यावेळी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी उपस्थित त्यांना सांगितले की शासनाने जीआर काढून डॉक्टरांना जेनेरिक औषधे रुग्णांना देण्यास सांगितले आहे त्याची अंमलबजावणी होते की नाही यावरती आमचे लक्ष असले तेही त्यांनी आवर्जून सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा