Breaking

बुधवार, ३१ मे, २०२३

बेलवंडी पोलीसांनी गांज्या व १ आरोपी आणि ६,२४,०९०/- रू किंमतीचा मुददेमाल पोलिसांकडून जप्त...



बेलवंडी पोलीसांनी गांज्या व १ आरोपी  आणि ६,२४,०९०/- रू किंमतीचा मुददेमाल पोलिसांकडून जप्त... एक


श्रीगोंदा-नितीन रोही

सविस्तर असे की अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  यांनी माहे मे २०२३ चे क्राईम मिटींगमध्ये दिलेल्या सक्त आदेशाच्या अनुशंगाने बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय टेंगे  कारवाई करत असताना दि.३०.०५.२०२३ रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बेलवंडी पोलीस स्टेशन हददीत ढवळगाव ते पिंपळगाव पिसा रोडवर अवैध दारु, व बनावट हत्याराची चोरटी वाहतुक होणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पो. नि. संजय टेंगे यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांना सदर ठिकाणी पंचासह जावुन कायदेशिर कारवाई करणेबाबत आदेश देवून त्यांना ढवळगाव ते पिंपळगाव पिसा रोडवर पिंपळगाव पिसा आटाचा मळा येथे रवाना केले असता पोलीस अधिकारी व कर्मचारी हे प्रत्येक संशयीत वाहनांना थांबवुन त्याची तपासणी करत असताना दि. ३०.०५.२०२३ रोजी सायंकाळी १६.३० वा. चे सुमारास एक सिल्वर रंगाची पजेरो गाडी क्र MH ०१ AL १२३४ अशी आली असता नमुद गाडीस थांबवुन त्यात बसलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव बबन संभाजी पंदरकर रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा असे सांगितलेने त्याचे गाडीची झडती घेतली असता सदर गाडीमध्ये मागील सिटच्या खाली गांजाचे खाकी रंगाचे सात पुढे ७ किलो ४१८ ग्रॅम वजनाचे ७४,०००/- रू किंमतीचे तसेच ५,५०,०००/- रु किंमतीची एक सिल्वर रंगाची पजेरो गाडी MH ०१ AL १२३४ असा एकुण ६,२४,०९०/- रू किंमतीचा मुददेमाल मिळुन आला असुन सदर बाबत बबन संभाजी पंदरकर रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा याचे विरुदध एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८ (C), २०(b) (ii)B प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास पो. स. ई. गाजरे हे करत आहेत.

सदरची कारवाई ही मा राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा. प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर. विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो कर्जत विभाग कर्जत, यांचे मागदर्शनाखाली पो.नि.श्री.संजय टेंगे, पो.स ई. गाजरे, स. फो. आर. टी. शिंदे, पो.हे.कॉ. हसन शेख पो.हे.कॉ. अनिनाव खेडकर, चा. पो.हे.कॉ. भाऊ शिंदे, पो.कॉ. विनोद पवार, पो. कॉ. संदिप दिवटे, पो. कॉ. कैलास शिपनकर, पो. कॉ. सतिष शिंदे, पो. कॉ.भांडवलकर, म.पो.ना. बलवे, म.पो.कॉ. घोगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कर्जत येथील पो.हे.कॉ प्रकाश शिंदे, पो. कॉ. इरुफान शेख यांनी केली आहे.

तरी बेलवंडी पोलीस स्टेशन हददीतील जनतेला आव्हान करण्यात येते की, कोणी अवैध दारू, गांजा व बनावट हत्याराची चोरटी वाहतुक करत असल्यास बेलवंडी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा