Breaking

शुक्रवार, २ जून, २०२३

गोदाबाई लोंढे यांचे निधन..


गोदाबाई लोंढे यांचे निधन..


 बेबळेl प्रतिनिधी.                फोटो

              बेंबळे येथील लोंढे परिवारातील गोदाबाई मच्छिंद्र लोंढे यांचे शुक्रवारी २जून रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले, ते 89 वर्षाच्या होत्या. त्यांचे पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे ,पतवंडे असा मोठा परिवार आहे. पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी हनुमंत लोंढे व दत्तात्रय लोंढे यांच्या त्या मातोश्री होत्या, तसेच सिंहगड कॉलेज पुणे येथील कॉम्प्युटर इंजिनिअर विभागातील प्राध्यापक व राज्यातील सुप्रसिद्ध शिवचरित्र व्याख्याते प्रा.औदुंबर दत्तात्रय लोंढे यांच्या त्या आजी होत्या. मयत गोदाबाई लोंढे यांचे पार्थिवावर भीमा नदीकाठी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार  करण्यात आले, याप्रसंगी सर्व समाजातील शेकडो नागरिक आवर्जून उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा