*अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त काटी ग्रामपंचायत च्यावतीने महिलांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.*
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
काटी - तुळजापूर ,
"नारी शक्तीचा सन्मान हाच देशाचा अभिनान"प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून, *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त 31 मे 2023 रोजी महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मधील दोन महिलांचा सत्कार करण्याचे आदेश पारीत करण्यात आला.त्याप्रकारे काटी ग्रामपंचायत येथे अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी साजरी करण्यात आली. त्यानंतर लोकनियुक्त सरपंच आशा सुजित हंगरकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार,1)आशा विलास कुलकर्णी
2) रुबिना जुबेर शेख
जाहीर करण्यात आला .
आशा विलास कुलकर्णी यांना सरपंच सौ आशा हंगरकर यांच्या हस्ते प्रमानपत्र/सन्मान चिन्ह/500रू रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.त्यानंतर दुसरा पुरस्कार सौ. रुबीना जुबेर शेख यांना श्री सयाजीराव देशमुख मा.चेरमान व मा.सरपंच शामराव आगलावे यांच्या हस्ते प्रमानपत्र/सन्मान चिन्ह/500रू रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात.त्या वेळी मा.सरपंच अशोक जाधव, प्रदीप साळुंखे, संपत पंखे, भैरवनाथ काळे,प्रकाश सोनवणे,अमोल गावडे, बाळासाहेब शिंदे,चंद्रकांत काटे,अविनाश देशमुख,नंदू बनसोडे, भोलेनाथ बनसोडे, बाळासाहेब मासाळ, रंजना शिंदे, शुभांगी काटे, सुहास कुलकर्णी,आप्पा आगलावे, आप्पा बनसोडे,प्रशांत गावडे, प्रकाश गाटे,उमेश लवटे, कादर शेख कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित हंगरकर यांनी केले व आभार पर मनोगत उपसरपंच जुबेर शेख यांनी व्यक्त केले .आदीसह सर्व अंगणवाडी सेविका,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा