Breaking

मंगळवार, २ मे, २०२३

माढा तालुक्यातील अकोले-खुर्द येथील सचिन मारुती घाडगे यांची तालुका भूकरमापक पदावर सरळसेवा भरतीमध्ये निवड*


*माढा तालुक्यातील अकोले-खुर्द येथील सचिन मारुती घाडगे यांची तालुका भूकरमापक पदावर सरळसेवा भरतीमध्ये निवड*


टेंभुर्णी : - महाराष्ट्र शासनाच्या भूमिअभिलेख विभागाच्या वतीने सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत माढा तालुक्यातील अकोले-खुर्द येथील सचिन मारुती घाडगे यांची तालुका भूकरमापक पदावर सरळसेवा भरतीमध्ये निवड झाली आहे.यानिवडीने घाडगे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सचिन घाडगे याचे अकोले-खुर्द येथील बबनराव शिंदे विद्यालयातून दहावीचे शिक्षण घेतले आहे.तर तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातुन त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली.त्यानंतर त्याने पुणे येथे दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती.सचिन घाडगे हा सुरुवातीपासून हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता.सचिन घाडगे याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळविण्याचे ध्येय आहे.

या यशाबद्दल घाडगे याचे केंद्र संचालक भाऊ शिंदे,अहमदनगर येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी वैभव शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा