Breaking

शुक्रवार, १९ मे, २०२३

ड्रेसकोड वरून मंदिर संस्थान चा युटर्न,वारकरी आचारसंहिता परिषदेचे मुख्य प्रवर्तक झरेगांवकर महाराज यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान ला सुनावले खडे बोल*



*ड्रेसकोड वरून मंदिर संस्थान चा युटर्न,वारकरी आचारसंहिता परिषदेचे मुख्य प्रवर्तक झरेगांवकर महाराज यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान ला सुनावले खडे बोल*



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.


श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने कृपया ''भारतीय संस्कृती'' आणि सभ्यतेचे भान ठेवा अश्या आशयाचे फलक लावत,अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पॅन्ट,बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही.असे फर्मान काढले.

*आणि चार सहा तासांतच तहसिलदार सौदागर तांदळेंनी हे फर्मान रद्द केले.* 

मुळात असे निर्णय घेताना सर्वप्रथम यावर रितसर मंथन चिंतन करायला हवे असते.संस्थान व शासकीय अधिकारी यांच्यात योग्य तो समन्वय असणं गरजेचं आहे. तो नसेल तर मघ असं तोंडावर पडायची वेळ येते.

*निर्णय जरी साधारण वाटत असला तरी तो संविधानातील "व्यक्ती स्वातंत्र्यʼʼ या कायद्याभोवती फिरणारा आहे.* त्यामुळे मंदिर संस्थान किंवा जिल्हाधिकारी असे निर्णय घेण्यासाठी कितपत सक्षम आहेत हे बघणंही गरजेचं आहे.
 
यासाठी जर पश्चिम महाराष्ट्र मंदिरे देवस्थान समिती पुढे येऊन अधिकृतपणे काही योग्य मार्ग काढायचा प्रयत्न करत असेन तर निश्चितच फरक पडेल.त्यासाठी सुप्रीम कोर्टात तशी याचिका दाखल करून कायमस्वरूपी हा प्रश्न मार्गी लावता येतो का हे बघितलं पाहिजे.

तुळजापुर,पंढरपूर येथे येणार्या भाविकांमधे गोरगरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय भाविकांची संख्या ही फार मोठी आहे ,इथे येणारा VIP वर्ग आणि त्याची संख्या मर्यादित आहे.त्यामुळे सर्वार्थाने मंदिरांची आचारसंहिता भंग करणारा VIP वर्गच असतो.

दुसरी गोष्ट मंदिर संस्थान म्हणते "भारतीय संस्कृती" चे भान ठेवा मुळात संस्थान चा भारतीय संस्कृतीवर किती अभ्यास झाला आहे हेही बघणं गरजेचं आहे.

गंमत म्हणून असे निर्णय घेता येत नाहीत,आणि घेतलेच तर त्यावर ठाम ही राहता आलं पाहिजे.
*तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरा गबाळाचे काम नोहें ॥*  

ह.भ.प.श्री निलेश महाराज झरेगांवकर 
*वारकरी आचारसंहिता परिषद महाराष्ट्र राज्य*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा