Breaking

शुक्रवार, २३ जून, २०२३

टेंभुर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन. मागील 12 वर्षा पासुन चालु आहे उपक्रम.




टेंभुर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वारकऱ्यांसाठी  आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन.                                                

 मागील 12 वर्षा पासुन चालु आहे उपक्रम.  

  

  बेंंबळे। प्रतिनिधी।                       

         आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने टेंभुर्णी येथे  मोफत आरोग्य शिबिराचे आयोजनकरण्यात आले असून या आरोग्यसेवा उपक्रमाचे हे बारावे वर्षे  असल्याची माहिती माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी दिली आहे.
    या शिबिराचे उदघाटन टेंभुर्णी प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीमती लाखाळ , राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सविता जगताप , जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी शिवाजीराव पाटील ,तुकाराम ढवळे तालुका पंचायतचे सदस्य वैभव बापू कुटे यांचे प्रमुख उपस्थितीत पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
आपल्या प्रास्ताविकमधे राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी सांगितले की,आ.बबनराव शिंदे, व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गेल्या 12 वर्षांपासून सुरू ठेवला आहे.याठिकाणी आरोग्य समस्या,डोळ्यांचे उपचार, दाताचे उपचार व इतर सर्व उपचार वारकऱ्यांसाठी मोफत करण्यात येत आहेत टेंभुर्णी शहराच्या करमाळा रोड येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष  सचिन  होदाडे, शिवाजीराव पाटील यांनी ही आपले समायोजित विचार व्यक्त केले
   या आरोग्य शिबिर उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी  काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोसले,युवक तालुकाध्यक्ष संभाजी पाटील अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव शब्बीर जहागीदार,तालुका कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कुटे,संजय मिस्किन महेंद्र वाकसे,श्रीकांत लोंढे, सतीश काळे,फिरोज तांबोळी कल्याणराव अनपट, हरिभाऊ गोरे,   तसेच आरोग्य सेविका, आरोग्य विभागातील श्री. घंटे,राजाभाऊ चौधरी आदी उपस्थित होते .
  आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मंगेश देशमुख यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा