Breaking

शनिवार, १० जून, २०२३

युवा नेते मा.अमोल भैय्या कुतवळ यांच्या मार्गदर्शनाखाली दयावन चषक (तुळजापूर प्रीमिअर लीग ) -2023 चे उदघाटन*


*युवा नेते मा.अमोल भैय्या कुतवळ यांच्या मार्गदर्शनाखाली दयावन चषक (तुळजापूर प्रीमिअर लीग ) -2023 चे उदघाटन*


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

आज दिनांक 10 जून 2023 रोजी युवा नेते मा.अमोल भैय्या कुतवळ यांच्या मार्गदर्शनाखाली दयावन चषक (तुळजापूर प्रीमिअर लीग ) -2023 चे उदघाटन धाराशिव जिल्ह्याचे खासदार मा.ओमराजे निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.धिरज भैय्या पाटील,अमोल भैय्या कुतवळ यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी जेष्ठ नेते, गोकुळ तात्या शिंदे,शाम पवार, युवक नेते ऋषिकेश भैय्या मगर,रणजित भैय्या इंगळे, बाजार समितीचे नूतन संचालक सुहास गायकवाड,सुनील मामा शिंदे,युसुफ मामा शेख,छोटू काका पाटील, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी सौदागर जाधव, अजय धनके, पप्पू पवार,सौरभ भोसले,बापू चव्हाण,औदुंबर करंडे,आदित्य पवार, बाळू धनके,जफर शेख ,श्रेयस कुतवळ, व फ्रेंडस फॉरेव्हर संघातील सर्व खेळाडूंनी परिश्रम घेतले..
स्पर्धे मधील प्रथम सामना हरीश XI  vs गोलाई ग्रुप मध्ये झाला या अटीतटीच्या सामन्या मध्ये गोलाई ग्रुप संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटक मध्ये 107 धावांचे लक्ष्य दिले होते त्या त्या लक्ष्याचा पाठलाग करताना हरीश XI संघ फक्त 100 च धावा करू शकला गोलाई संघाने हरीश XI संघावर 6 धावांनी मात केली...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा