Breaking

बुधवार, १४ जून, २०२३

आवार पिंपरीचे पोलीस पाटील यांच्या विरोधात सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार


आवार पिंपरीचे पोलीस पाटील यांच्या विरोधात सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार 
परंडा   /   प्रतिनिधी  

परंडा तालुक्यातील आवारपिंपरी येथील पोलीस पाटील नरूटे यांच्या विरोधात वाळु प्रकरणी उपविभागीय अधिकारी भूम यांच्याकडे दि १२ / ०६/ २०२३ रोजी गावचे सरपंच,  उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य यांनी तक्रार दिली असुन पोलीस पाटील यांची वर्तणुक चांगली नसल्यामुळे त्यांना  कायमचे कामावरून काढण्याची मागणी तक्रार अर्जात केली आहे . याबाबत  दिलेल्या लेखी तक्रार अर्जात म्हंटले आहे की , आम्ही आवारपिंपरी गावचे सरपंच, उपसरंच व सदस्य असून आवारपिंपरी गावचे पोलिस पाटील वैभव हनुमंत नरूटे  रा. आवारपिंपरी हे सरपंच  व इतर सदस्य यांनी वाळु चोरी होत असताना तोडी सांगितले असता मान्य करीत नाहीत. यासंबंधी सरपंचानी गेल्या पाच सहा महिन्यापासून पाठपुरावा करून तहसिल कार्यालयात वाळू चोराविरुध्द पोलिस पाटीला विरुध्द तक्रारी देखील केल्या असून तो आपले कर्तव्य निट पार पाडीत नाही तसेच सदस्य व सरपंच हे  महिला असल्याने त्यांना उध्दट बोलून गैरवर्तन करत आहे तसेच अरेरावीची भाषा वापरत असून तुमच्या घरच्यांना/ पुरुष मंडळीना मला सरकारने 353 कलमाचा  आधार दिला असून तुमच्या घरच्यांना 353 गुन्हामध्ये अटक करून जेलमध्ये टाकतो अशी धमकी दिली जाते. तसेच वाळु चोरांशी संगनमत करून वाळू चोरी करत असून ग्रामपंचायत कामात : लागणारी वाळुही आमच्याच वाहनामधून आणावी नाहीतर मी दुसरीकडील वाळुचा पंचनामा करून (Show Cause • शोकाँज तहसील कार्यालयाला कळवीन असे धमकावतो तसेच तो गावात गटबाजी करून पार्टीशन करत आहे. तरी पोलीस पाटील यांची वर्तणुक चांगली नसल्याने त्यांची चौकशी करून त्यांना कामावरून कायमचा  बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे . दिलेल्या तक्रार अर्जावर आवारपिंपरीचे सरपंच शुंभागी विकास नरूटे , उपसरपंच राणी विजयकुमार गुडे , सदस्य राणी देशभुषण सावळे यांच्या सह्या आहेत .



*चौकट* - 

पोलीस पाटील यांचे कुटुंब हे गुन्हेगारी पार्श्वभुमीचे असून पूर्वी याच्या कुटुंबावर अनेक गुन्हे दाखल असून त्यामध्ये वाळु चोरी प्रकरणात त्याच्या भावावर तहसिलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याच्या गुन्हा दाखल असल्याचेही तक्रार अर्जात म्हंटले आहे  तसेच मागील साहेबांनी  वाळु  चोरी गुन्हयामध्ये पोलीस पाटील यांना एकदा  निलंबीत केले होते . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा