Breaking

गुरुवार, १५ जून, २०२३

लोकनेते भाई वैद्य पत्रकारीता पुरस्कार कुर्डुवाडीचे ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे यांना घोषीत



कुर्डुवाडी:-ज्ञान फौंडेशन" पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा "लोकनेते भाई वैद्य पत्रकारिता पुरस्कार" कुर्डुवाडीचे ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे यांना देण्यात येणार असल्याची घोषणा  फौंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते यांनी पत्रकार परिषदेत दिली
.
     कुर्डुवाडीचे पत्रकार अरुण कोरे यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारिता या बिरुदाचे खरेखुरे पाईक राहून निर्भिड पत्रकारितेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक,औद्योगिक व राजकीय अन्यायाची सर्व प्रकरणे धसास लावून पत्रकारितेतील सत्याची चाड असणारा पत्रकार अशी त्यांची ओळख आहे.भारत देशाच्या सत्य मेव जयते या ब्रीद वाक्या नुसार त्यांची जीवनशैली असल्याने फौंडेशनला कोरे यांचा सन्मान करतांना आनंद होत आहे असेही कोलते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
    माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते व संस्थात्मक अध्यक्ष आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ.अभिजीत वैद्य तसेच महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी २४ जून २३ रोजी हा कार्यक्रम पुणे येथील एस.एम.जोशी फौंडेशनमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
   याच प्रसंगी रत्नागिरीचे ज्येष्ठ समाजसेवक बाळासाहेब पाटणकर यांना स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
   संस्थेच्या सचिव सौ.अर्चना मुंद्रा, खजिनदार सचिन शिंदे,विश्वस्त अमरसिंह राजपूत आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
    ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे यांना यापूर्वीही पुणे प्रेस क्लब,महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा बाळशास्त्री जांभेकर दर्पण,पा.वा.गाडगीळ शोध पत्रकारितेची अनेक पारितोषिके मिळाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा