Breaking

शुक्रवार, २ जून, २०२३

तनुजा तांबोळी व आश्विनी थोरात अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित.... नूतन पदाधिकारी व विद्यार्थ्यांचा सत्कार..



तनुजा तांबोळी व आश्विनी थोरात अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित.... 


 नूतन पदाधिकारी व विद्यार्थ्यांचा सत्कार..


बेंंबळे। प्रतिनिधी                             

            महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचा तांबवे टें (ता.माढा ) ग्रामपंचायतीच्या वतीने दिला जाणारा ग्रामपंचायतस्तरीय पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तनुजा फिरोज तांबोळी  व अश्विनी सतिश थोरात यांना भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तथा ग्रामपंचायत सदस्या धनश्रीताई खटके , कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका निकिता खटके ,माजी उपसरपंच सुरेखा खटके, समाजसेविका वर्षा खटके,राणी खटके,अर्चना खटके,अभिता खटके,मैथली खटके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.तांबवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विमल अनिल खटके यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या गावातील कैलास भिवाजी लठ्ठे व कुणाल हनुमंत जाधव यांचा सत्कार करण्यात आला.निलेश शशिकांत देशमुख  यांची माढा तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, तर पैगंबर तांबोळी यांची माढा तालुका अपंग संघटनेच्या अध्यक्षपदी,संग्राम थोरात यांची बेंगलोर येथील सिनलेर कंपनीत वरिष्ठ अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.गावातील बारावी  व दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला.

           यावेळी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नागनाथ खटके , माजी सरपंच राजाभाऊ खटके,उद्योजक गोरख खटके,माजी उपसरपंच नागेश खटके, महारुद्र खटके, सोसायटीचे चेअरमन अशोक खटके, भजनदास खटके , सुभाष  खटके, सुधाकर खटके पाटील, माजी उपसरपंच मधुकर खटके, शेतकी अधिकारी दीपक  खटके, विजय खटके, विजय महाराज खटके, नवनाथ खटके, संजय खटके, ग्रामसेवक राजेश माळी, पोलीस पाटील जयसिंग पाटील, कृषी सहाय्यक क्षीरसागर, तलाठी प्रीती काळे, सुग्रीव  ढवळे , महेश देशमुख, उद्योजक सतीश थोरात, नितीन खटके, सुजित खटके, गोटू खटके, सुधीर खटके, सौरभ खटके, सोमनाथ खटके ,सागर खटके, बाळासाहेब खटके, शिवम कोल्हे, किशोर पाटील, सदाशिव खटके, संदीप खटके, कांतीलाल खटके, रणजीत देशमुख, महेश खटके, वैभव देशमुख,तानाजी थोरात,तानाजी पाटील गणेश पाटील, दीपक थोरात,संजय थोरात, नामदेव जाधव, जयश्री जाधव, अरुण करंडे, हनुमंत जाधव, भिवाजी लठ्ठे, आप्पासाहेब लठ्ठे, दीपक भगत, अक्षय लठ्ठे, सुयश खटके, राजवर्धन खटके पाटील, संभाजी वायदंडे, अजित वायदंडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ :- तनुजा तांबोळी व आश्विनी थोरात यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरव करताना भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तथा ग्रामपंचायत सदस्या धनश्रीताई खटके , कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका निकिता खटके ,उपसरपंच विमल पाटील, माजी उपसरपंच सुरेखा खटके, समाजसेविका वर्षा खटके,राणी खटके,अर्चना खटके,अभिता खटके.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा