Breaking

शनिवार, ३ जून, २०२३

लोहटा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान*




*लोहटा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान*    


AJ 24Taas News साठी
 *
औसा प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सूर्यवंशी*.      

***************************** 

"नारी शक्तीचा सन्मान हाच देशाचा अभिनान"प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त 31 मे 2023 रोजी महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मधील दोन महिलांचा सत्कार करण्याचे आदेश पारीत करण्यात आला.त्याप्रकारे  लोहटा ग्रामपंचायत येथे अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी साजरी करण्यात आली. सरपंच गणेश किसनराव चव्हाण त्यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार लक्ष्मी चंद्रकांत मोरे व शारदा पिराजी वाघमारे यांना जाहीर करण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका जगताप मॅडम यांच्या हस्ते शारदा वाघमारे यांना सन्मान चिन्ह रोख रक्कम 500 रुपये शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व  लक्ष्मी मोरे यांचा सत्कार सुलक्षणा शिंदे आशा कार्यकर्त्या यांनी करून प्रमाणपत्र शाल श्रीफळ रोख रक्कम 500 देऊन करण्यात आला. यावेळी उपस्थित सरपंच गणेश चव्हाण श्री भरत फत्तेपुरे गणेश घोडके बालाजी फत्तेपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा