Breaking

बुधवार, २८ जून, २०२३

जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कु.अक्षता अबदागिरे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार



जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कु.अक्षता अबदागिरे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार


म्हसवड(प्रतिनिधी)- म्हसवड येथील अबदागिरे कॉम्प्लेक्स वतीने महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये कु.अक्षता अंकुश अबदागिरे हिची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि.श्री.राजकुमार भुजबळ होते.
यावेळी सपोनि.श्री.भुजबळ म्हणाले आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे जे पालक आपल्या मुलींना शिक्षणाची संधी देतात त्या मुली संधीच सोनं केल्याशिवाय राहत नाहीत याचे उदाहरण म्हणजे कु.अक्षता अबदागिरे ही आहे.
कु.अक्षताचे वडील अंकुश अबदागिरे यांनी त्यांच्या मुला-मुलींना शिक्षणाची संधी दिल्यामुळे त्यांची तिन्ही मुले चमकत आहेत.तसेच मुलांच्या यशामध्ये शिक्षकांचाही मोलाचा वाटा असतो.आज अक्षता अबदागिरे हीने जे यश मिळवले आहे ते कौतुकास्पद असुन तिने यावरच न थांबता यापेक्षा मोठी अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगून ते पुर्ण करावे व आपल्या अधिकाराचा वापर जनकल्याणासाठी करावा त्यावरच आपलं सक्सेस अवलंबून असतं असे उद्गार भुजबळ यांनी काढले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना कु.अक्षता अबदागिरे म्हणाल्या आज माझ्या यशामागे माझे आई-वडील आणि गुरुजन यांचा मोलाचा वाटा आहे माण तालुका दुष्काळी तालुका म्हणून परिचित आहे.पाणी पश्न ही एक तालुक्याला मोठी समस्या भेडसावत असते.याची मला पुर्ण जाण असल्याने मला माझ्या जलसंपदा विभागात काम करताना निश्चित मदत होणार आहे मी माझ्या विभागात काम करत असताना ज्या भागामध्ये मला संधी मिळेल त्या भागातील जनकल्याणासाठी प्रमाणिकपणे काम करणार असून माण तालुक्यातील मुला-मुलींनी स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन अधिकारी बनावे असे आव्हान अक्षता अबदागिरे यांनी करुन आज अबदागिरे कॉम्प्लेक्स हे आमचे एक कुटुंब असुन या कुटुंबीयांच्या वतीने आज माझा वाढदिवस साजरा करुन सत्कार केला  व यावेळी माझे गुरुजन वर्ग  उपस्थित होते हा आनंद द्विगुणित झाला आहे.
यावेळी म्हसवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री.सर्जेराव माने,सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.प्रविण दासरे,मजी नगरसेवक श्री.बी.एम अबदागिरे,ज्ञानवर्धिनी हायस्कूलचे प्राचार्य श्री.गोपाळ मासाळ,माजी सरपंच श्री.युवराज बनगर,श्री.बाळासाहेब कलढोणे,श्री.पोपटराव बनसोडेप पाटील,श्री.विजय भागवत,श्री.विक्रम लोखंडे, श्री.महावीर पिसे,श्री.योगेश जंगम आदी मान्यवर उपस्थित होते,
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.अंकुश अबदागिरे यांनी केले तर सुत्रसंचालन श्री.आप्पासाहेब गायकवाड पाटील यांनी केले तर आभार श्री.बी.एम.अबदागिरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा