Breaking

बुधवार, २८ जून, २०२३

चिमुकल्या वारकऱ्यांनी घडविले गणपती मळ्याकरांना विठुरायाचे दर्शन.*




*चिमुकल्या वारकऱ्यांनी घडविले गणपती मळ्याकरांना विठुरायाचे दर्शन.*


 श्रीगोंदा प्रतिनिधी - नितीन रोही 

अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर संतांच्या स्पर्शाने  पावन झालेला महाराष्ट्र माझा आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनाला मोठ्या संख्येने दरवर्षी प्रमाणे याही गेलेला आहे अशीच परंपरा कायम राहावी म्हणून येणाऱ्या पिढीला तसे संस्कार मिळाले पाहिजे
श्रीगोंदा  शहरातील गणपती मळा (मेहेत्रे वस्ती)येथील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून चिमुकल्यांची पालखी दिंडी  सोळाव्याचे  आयोजन करण्यात आले होते
 ज्ञानोबा तुकाराम  ज्ञानोबा तुकाराम व टाळ्याच्या गजरात चिमुकल्या वारकऱ्यांनी गणपती मळा सह पंचक्रोशीतील  ग्रामस्थांना विठुरायाचे  दर्शन घडविले विठूरायाचा गजर करीत श्री गणपतीच्या दर्शनाला चिमुकल्यांचा वारकरी  पालखी सोहळा गेला.
 चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी पालखी पाहून ग्रामस्थांचे डोळे आनंदवले. व ग्रामस्थांनी या दिंडीचे दर्शन घेतले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य व पालकांचे ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.  श्रीमती वाळुंज मॅडम,श्री.शेलार सर व श्रीमती गांगर्डे मॅडम, सौ अनिता दांडेकर मॅडम यांनी बालदिंडीचे आयोजन  केले. शेवटी शाळेच्या वतीने सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा