*विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत वारक-यांना आल्पोहाराचे वाटप*
टेंभुर्णी/प्रतिनिधी
पंधरा हजार वारक-यांनी घेतला आल्पोहाराचा लाभ
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत सालाबादप्रमाणे कारखाना कार्यस्थळावरून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणा-या निरनिराळ्या दिंड्या व दिंडीतील वारक-यांना याही वर्षी 22 जून पासून लाडू व चिवडा या आल्पोहाराचे वाटप सुरू करण्यात आले असल्याची माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे यांनी सांगितले की प्रतिवर्षी नाशिक,नगर, जामखेड, शेगांव व इतर ठिकाणच्या अनेक पालख्या व दिंड्या पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्यावरून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला श्री.विठ्ठल च्या दर्शनासाठी जात असतात. या पालख्या व दिंड्या मध्ये समाविष्ट असलेल्या वारक-यांना प्रतिवर्षी कारखान्यामार्फत लाडू व चिवडा या आल्पोहाराचे वाटप करण्यात येते. चालु वर्षी ही 22 जून पासून वारक-यांना लाडू व चिवडा आल्पोहाराचे वाटप सुरू करण्यात आले असून आत्तापर्यंत 14 ते 15 हजार वारक-यांनी या आल्पोहाराचा लाभ घेतला आहे. तसेच जामखेड येथील ह.भ.प रासकर महाराज यांचे वारक-यांची दिंडी प्रति वर्षी मुक्कामी कारखाना कार्यस्थळावर येत असून त्यांना कारखान्यामार्फत जेवण देणेत येते, यावर्षीही 25 जून रोजी मुक्कामी दिंडीस जेवण देण्यात आले आहे. कारखान्याच्या या उपक्रमाबद्दल वारक-यांमधून समाधान व्यक्त केले जात असल्याची माहीती आ.शिंदे यांनी दिली.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, संचालक विक्रमसिंह शिंदे, पोपट गायकवाड, सुरेश बागल, पोपट गायकवाड,निळकंठ पाटील, लाला मोरे, पांडूरंग घाडगे, विष्णु हुंबे, सचिन देशमुख, पोपट चव्हाण कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, जनरल मॅनेजर एस. आर.यादव, वर्क्स मॅनेजर ए.डी.ढेकाणे, जनरल मॅनेजर(प्रोसेस)पी.एस.येलपले,फायनान्स मॅनेजर डी.डी.लव्हटे, केन मॅनेजर एस.पी.थिटे, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल, सिव्हील इंजिनिअर एस.आर.शिंदे, कामगार प्रतिनिधी अनिल वीर हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा