पिलीव येथे महाराणा प्रताप जयंती निमित्त मिरवणुकीचे आयोजन
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस -
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे महाराणा प्रताप जयंती निमित्त पिलीव बाजारपेठेतुन महाराणा प्रताप यांच्या प्रतीमेची समाजबांधवाच्यावतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी या मिरवणुकीमध्ये पारंपरिक पद्धतीचा दांड पट्टा हे मिरवणुकीतले खास आकर्षण होते. यावेळी गणेश भैस,समर्थ जामदार, अंकुश भैस, समशेर रजपुत, कुमार. बा. भैस,विक्रम भैस,दत्तूसिंग भैस,विशाल जनवर,सतीश रजपुत, अनंता जामदार, राजेंद्रसिंग जामदार, विठ्ठल भिसन,प्रमोद भैस,नितीन जामदार, धिरज जामदार, अतुल भैस,रणजित मंजार,अक्षय भिसन,मयुर भैस,सागर भैस,राहुल जामदार, नागेश जनवर,सोमनाथ भैस यांच्या सह संयुक्त महाराणा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मिरवणुकीवेळी पिलीव पोलीस ठाणयाचे ठाणे अंमलदार पंडीत मिसाळ व अमीत जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. फोटो - पिलीव बाजारपेठेतुन महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेची काढलेली मिरवणूक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा