Breaking

सोमवार, ५ जून, २०२३

कळंब तालुक्यातील वाठवडा येथील रोपवनास लागली आग;आगीमध्ये वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान,संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची काॅ.भाई बजरंग ताटे यांची मागणी.


कळंब तालुक्यातील वाठवडा येथील रोपवनास लागली आग;आगीमध्ये वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान,

संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची काॅ.भाई बजरंग ताटे यांची मागणी.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
 
कळंब तालुक्यातील मौजे वाठवडा येथील वन जमीन गट नंबर 192 मध्ये अंदाजे पाच हेक्टर वरील रोप वनास दि. 31 मे 2023 रोजी पाच वाजण्याच्या सुमारास रोपवानास आग लागून या आगीमध्ये लाखो रुपयांचे वन विभागाचे नुकसान झाले असल्याचे निवेदन श्रमीक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष काॅ.भाई बजरंग ताटे यांनी  जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद व वनपरिक्षेत्र अधिकारी भूम यांना तक्रार निवेदनाद्वारे कळविले आहे. देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,मौजे वाठवडा या गावांमध्ये वन विभागाचे मोठया प्रमाणात रोपवन अदाजे चार वर्षां पासून आहे. या रोपवनाला दि.31मे रोजी पाच वाजण्याच्या सुमारास आग लागुन लाखों रुपयाचे वन विभागाचे नुकसान झाले आहे. या रोपवनास लागलेली आग विझवण्यासाठी एक ही वन विभागाचा कर्मचारी धावला नाही. तर सदरच्या ठिकाणी रोपवणास जाळ रेखा आखली नसल्यामुळे सदर प्रकार घडला असल्याचे निवेदन म्हटले आहे. या ठिकाणी वन विभागाचे कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी  यांचा हलगर्जीपणा या वरुन दिसत आहे.त्यामुळे संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून  कर्तव्यत कसुर केल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सदरील आगीची जाय मोक्यवर जाऊन पंचनामा करून चौकशी करावी व वन विभागाचे या आगी मुळे किती रुपयाचे नुकसान झाले आहे? याची खातरजमा  करावी. सदरील निवेदनावर आवश्यक कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर श्रमिक मानवाधिकार संघांचे संस्थापक अध्यक्ष तथा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती सदस्य महाराष्ट्र शासन काॅ.भाई बजरंग ताटे, श्रमिक मानवाधिकार संघाच्या जिल्हाध्यक्षा सौ.माया शिंदे, मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे, सुनील गायकवाड, महादेव शिंदे, अशोक कसबे,नवनाथ भंडारे यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा