डॉ. राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तांबवे (टें) येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करून प्रवेशोत्सव
टेंभुर्णी प्रतिनिधी:- माढा तालुक्यातील तांबवे (टें) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता १ली तील दाखल होणाऱ्या नवगतांचे स्वागत गुलाब पुष्प, पुस्तके, वह्या, पेन्सिल, पेन असे शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आले. गावातील सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र कांबळे यांनी टेंभुर्णी येथील पाटील हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे लहान मुले उत्साहाने शाळेत आले होते. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत ढवळे, उपाध्यक्ष नितीन खटके, माढा तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मच्छिंद्र कांबळे, महेश खटके, सचिन तळेकर, सागर पाटील, नितीन पाटील, वैभव देशमुख, बापू कांबळे, प्रवीण गोडसे, रणजीत देशमुख, मुख्याध्यापक तानाजी ढवळे, सहशिक्षिका सुमन कुटे, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग आदी जण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा