*पुणे येथून पिकअप टेम्पो चोरून घेऊन निघालेल्या चोरट्यास टेंभुर्णी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून करकंब जवळ पकडले*
टेंभुर्णी : मोशी (पिंपरी चिंचवड) पुणे येथून पिकअप टेम्पो चोरून घेऊन निघालेल्या चोरट्यास टेंभुर्णी पोलिसांनी इंदापूर व करकंब पोलिसांच्या मदतीने करकंब येथे पिकअप टेम्पोसह थरारक पाठलाग करून पकडले.ही घटना सोमवारी सायं घडली आहे.
असून सदर चोरत्यास चोरट्यास पिंपरी चिंचवड पोलिसाच्या ताब्यात दिली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की,टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विनोद साठे यांना ०५ जून रोजी पिकअप टेम्पो मालकाच्या भाचा अमोल गाडे यांनी संपर्क करून सांगितले की,पिकअप टेम्पो क्रमांक एम एच १४ इ.एम १२५ हा मोशी (पिंपरी चिंचवड)येथून अज्ञात चोरट्याने चोरी करून तो टेंभुर्णीच्या दिशेने येत आहे.ही माहिती मिळताच पोना विनोद साठे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना ही माहिती सांगितली.पोनि निंबाळकर यांनी तातडीने पोना साठे व चालक पोकॉ खंडागळे यांना योग्य त्या सूचना देऊन पिकअप पकडण्याचे आदेश दिले.यानंतर पोना साठे यांनी इंदापूर ट्रॅफिक पोलीस अमोल रामचंद्र खाडे,अर्जुन नरळे यांना नाकाबंदी करण्यास सांगितले.मात्र तेथील नाकाबंदीस हुलकावणी देऊन चोरट्याने पिकअपसह टेंभुर्णीच्या दिशेने पळ काढला.
त्यानंतर टेंभुर्णीत ही नाकाबंदी केली असता त्याने टेंभुर्णीतील नाकाबंदी हुलकावणी देत करकंबच्या दिशेने निघून गेला.यावेळी इंदापूर,टेंभुर्णी पोलीस त्याचा पाठलाग करीत होते.पोलिसांनी करकंब पोलिसांना करकंब येथे नाकाबंदी करण्यास सांगितले. तेथे नाकाबंदी व पोलीस पाहून त्या चोरट्याने विठ्ठलराव शिंदे शुगर युनिट दोन च्या दिशेने धूम ठोकली.मात्र पोलिसांनी पाठलाग करून पिकअप पकडले.तेथे ही पिकअप टेम्पो सोडून सदर चालकाने उसाच्या शेतातून पळ काढला.तरीही पोलिसांनी पाठलाग करून त्यास त्यास घेरून सीताफिने अटक करून त्यास चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा