ग्रा.पं. सदस्या शोभाताई परबत यांचे निधन...
वडाच्या झाडाचे रोप लावून त्याच्या मुळाशी केले रक्षाविसर्जन....
बेंबळे। प्रतिनिधी।
तडवळे तालुका माढा येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या शोभाताई विश्वनाथ परबत यांचे रविवार दिनांक 4 जून रोजी रात्री अपघाती निधन झाले, त्या 51 वर्षाच्या होत्या. त्यांचे पश्चात पती वि.का. सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ परबत, मुलगा डॉक्टर संग्राम ,मुली सोनाली निलेश देशमुख ,डॉक्टर माधवी शिंदे व शिवगंगा केमदारणे तसेच दीर, जावा, नंणंदा व इतर नातेवाईक असे 25 जणांचे एकत्रित कुटुंब आहे. मंगळवार दिनांक 6 जून रोजी मयत शोभा परबत यांच्या स्मृती प्रित्यर्थ वटवृक्षाचे रोप लाऊन त्याच्या बुडाशी (मुळाशी) कै. शोभाताई यांच्या रक्षेची विसर्जन करण्यात आले. पर्यावरण समतोला बरोबरच त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात हीच कुटुंबीयांची ईच्छा व अपेक्षाआहे. मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांच्या त्या सासुबाई होत .शोभाताई परबत यांच्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा