*वासुदेव गल्ली येथे नागरिकांसाठी कै,सुरेश आप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ,कै.सुरेश आप्पा पाटील सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन*
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
दिनांक 5 जून 2023 रोजी वासुदेव गल्ली येथे नागरिकांसाठी कै. सुरेश आप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ ,कै. सुरेश आप्पा पाटील सार्वजनिक वाचनालया चे उदघाटन काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष मा.धीरज भैय्या पाटील,जनसेवक युवा नेते मा.अमोल भैय्या कुतवळ यांच्या हस्ते पार पडले,या प्रसंगी जेष्ठ नागरिक प्रताप दादा पाटील,नबीलाल चाचा शेख, किरण काका पाटील, युसुफ भाई शेख,छोटू पाटील, सुनिल मामा शिंदे,युवक नेते पंकज भैय्या पाटील,प्रवीण राजे कदम इ मान्यवर उपस्थित होते, तसेच गल्लीतील युवक मंडळी ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
छोटू काका पाटील व सुनील मामा शिंदे यांनी वाचनालयाचे महत्त्व तरुण पीडिला समजावून सांगितले तसेच जीवन जगताना वाचनाचे महत्त्व किती आहे हे ही सांगितले या प्रसंगी
मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व आप्पांच्या आठवणी जाग्या केल्या, शेवटी नबीलाल चाचा शेख यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपन्न झाला असे घोषित केले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा