माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढ दिवसानिमित्त आयोजीत उस्मानाबाद प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा रॉयल चॅलेंजर्स उस्मानाबाद विजेता.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढ दिवसानिमित्त आयोजीत उस्मानाबाद प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा रॉयल चॅलेंजर्स उस्मानाबाद विजेता.
माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उस्मानाबाद शहरात गाझी स्पोर्टस क्लब व साप्ताहिक उस्मानाबाद रिपोर्टर परिवाराच्या वतीने उस्मानाबाद प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग घेतला होता अंतीम सामन्यात उद्योजक सचिन शिंदे यांच्या रॉयल चॅलेंजर्स उस्मानाबाद संघाने उद्योजक श्याम अप्पा जहागीरदार यांच्या उस्मानाबाद कॅपिटल्स संघावर विजय मिळवित opl सिझन 5 चषकावर आपले नाव कोरले जिल्ह्याचे नेते आ. राणा दादा यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले विजेता संघाचे संघ मालक सचिन शिंदे यांना प्रथम पारितोषिक ट्रॉफी रोख रक्कम देण्यात आली तसेच या स्पर्धेचे आकर्षण माजी आमदार सुजित सिंह ठाकुर यांचे कट्टर समर्थक परंडा येथील मदरसा जमियातुल सुफी ए हिंद इफ्तेखारी चे अध्यक्ष वाहेद शेख यांच्या तर्फे विजेत्या संघाच्या संघमालकास अर्धा तोळा सोन्याची अंगठी ही राणा दादांच्या हस्ते श्री.सचिन शिंदे यांना प्रदान करण्यात आली द्वितीय पारितोषिक संघ मालक उद्योजक श्याम अप्पा जहागीरदार यांच्या उस्मानाबाद कॅपिटल्स संघाने पटकावले त्यांना आ. राणा दादांच्या हस्ते ट्रॉफी व रोख रक्कम देण्यात आली, हॉटेल सागर चे मालक तारेख शेख यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज चे बक्षिस रेंजर सायकल उत्कृष्ट प्लेअर आशिष मायचारी यांना आ. राणा दादांच्या हस्ते देण्यात आली, फायनल मॅच ऑफ द मॅच अक्षय बावस्कर यांना राणा दादांच्या हस्ते देण्यात आले यावेळी भाजपा नेते सुधीर पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजे निंबाळकर, भाजपा नेते निहाल काझी आयोजक तथा गाझी स्पोर्टस क्लब चे अध्यक्ष तथा साप्ताहिक उस्मानाबाद रिपोर्टर चे संपादक आसेम काझी, शकीब शेख, रईस शेख व मोठ्या संख्येने क्रिकेप्रेमी उपस्तिथ होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा