Breaking

गुरुवार, ८ जून, २०२३

अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी/ रिपाइं आठवले यांची मागणी...!



अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी/ रिपाइं आठवले यांची  मागणी...!


नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावामध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून आंबेडकरवादी भीमसैनिक दिवंगत अक्षय भालेराव यांची निर्गुण हत्या करणाऱ्या जातीयवादी मानसिकतेच्या निर्दयी गाव गुंडांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी. यासाठी रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपाइं माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळशिरस तालुका यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माळशिरस प्रभारी तहसीलदार अमरदिप वाकडे व नायब तहसीलदार आशिष सानप यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून बौद्ध तरुणाची निर्गुण हत्या केली जाते त्याचे आई- भाऊ यांच्यावरही चाकू हल्ला केला जातो हि निंदनीय आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करून अक्षय भालेराव यांच्या उर्वरित मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलगती न्यायालयात चालवावा, दिवंगत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियाला शासनाने आर्थिक मदत तात्काळ द्यावी, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देऊन कुटुंबाचे पुनर्वसन करावे,सदरचा खटला सुरू असेपर्यंत सर्व गावगुंडांना गावबंदी करण्यात यावी,अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी जेणेकरून पुन्हा असा गुन्हा कोणी करणार नाही अशाने कायद्याचा धाक निर्माण होईल.
अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळशिरस तालुका यांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष एन के साळवे पच्छिम महाराष्ट्र सचिव दयानंद धाईंजे युवक जिल्हा कार्याध्यक्ष किरण धाईंजे जिल्हा नेते शामराव भोसले जिल्हा नेते तुकाराम बाबर भारत आठवले आबा बनसोडे रमेश धाईंजे श्रीकांत सावंत एस एम गायकवाड तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे सरचिटणीस मारूती खांडेकर युवक तालुकाध्यक्ष दशरथ नवगिरे कोषाध्यक्ष समीर सोरटे कार्याध्यक्ष विनोद रणदिवे अकलूज शहराध्यक्ष अजित मोरे यंग ब्रिगेड होलार समाज संघटनेचे दादासाहेब नामदास युवक सरचिटणीस प्रवीण साळवे नगराध्यक्ष अशोक चव्हाण मार्गदर्शक भास्कर बनसोडे ता उपाध्यक्ष राम कांबळे संपर्क प्रमुख अण्णासो भोसले ता उपाध्यक्ष शेखर सावंत प्रसिद्धी प्रमुख मारुती शिंदे गौतम भंडारे ता उपाध्यक्ष सुनील ओवाळ संघटक प्रकाश गायकवाड यंग ब्रिगेड ता अध्यक्ष सुहास बिरलिंगे ता उपाध्यक्ष महेंद्र लोंढे ता उपाध्यक्ष संजय भोसले व बहुजन विद्यार्थी परिषद ता अध्यक्ष सुचित साळवे नितीन कांबळे महादेव सरवदे श्रीपुर अध्यक्ष गणेश सावंत वेळापुर अध्यक्ष शरद साबळे वेळापुर युवक अध्यक्ष स्वप्निल सरवदे अकलुज युवक अध्यक्ष अभिजीत वाघमारे माऊली भोसले सदाशिव नगर अध्यक्ष राजेंद्र जाधव नातेपुते अध्यक्ष संघर्ष सोरटे महावीर खंडागळे दीपक दळवी सुधीर भोसले सतीश गायकवाड अतिश आठवले भगवान भोसले अरुण सोनवणे मिलन धाईंजे अरूण सोनवणे अमोल जगताप विश्वजित कांबळे सद्दाम तांबोळी नवनाथ माने
इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते•

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा