*घाटंग्री तालुका उस्मानाबाद येथे खरिपाची पूर्वतयारी - कृषी विभाग आपल्या दारी कार्यक्रम*
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
मौजे घाटंग्री तालुका उस्मानाबाद येथे खरिपाची पूर्वतयारी - कृषी विभाग आपल्या दारी, कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी उस्मानाबाद श्री एस पी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला यावेळी मंडळ कृषी अधिकारी उस्मानाबाद श्रीम.एस. .एस. शेरखाने मॅडम यांनी गोगलगाय नियंत्रण, सोयाबीन वरील पिवळा मोझाईक, बी बी एफ तंत्रज्ञानाचा वापर, महाडीबीटी योजना याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मौजे घाटंग्री कोरडवाहू शाश्वत शेती (RAD) प्रकल्पाबाबत गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व मोठ्या प्रमाणात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले.श्री. महेश सर्जे कृषी सहाय्यक घाटंग्री यांनी बियाणे उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, पौष्टिक तृणधान्य वापर याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रणजीत शिंदे सरपंच घाटंग्री तसेच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा