बबनरावजी शिंदे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात
कन्हेरगाव(प्रतिनिधी)
२१ जून रोजी अकोले खुर्द ता.माढा येथील मा.बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्य विद्यालयात हॅप्पी मॉर्निंग ग्रुप टेंभुर्णी यांच्या प्रात्यक्षिक मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय योग दिन विद्यार्थ्यांच्या समवेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला .टेंभुर्णी येथील हॅप्पी ग्रुप सदस्य असणारे संस्थेचे सचिव तथा प्राचार्य राजेंद्र ठोंबरे सर व योगगुरू प्रमुख हरिभाऊ गोरे व गृपचे सर्व सदस्य सुभाष आबा शिंदे , संभाजी अनंतकवळस , कंदरचे माजी मुख्याध्यापक पवार सर , चौधरी भाऊसाहेब , पांडुरंग तात्या ढवळे , बापूराव दिडवळ , अरुण डोके , संदीप चोपडे , दिपकराव पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक धनंजय मोरे तसेच प्रशालेतील शिक्षक अनपट सर , एस एस पाटील सर , पवार सर. यांनी योगदिनी विद्यार्थ्यांसमोर वर्काऊट घेऊन सूर्य नमस्कार , योगा डान्स , प्राणायाम शेवटी पसायदानाने समारोप घेऊन मोठ्या उत्साहात जागतिक योगदिन संपन्न केला
हॅप्पी मॉर्निगचे सर्व सदस्यांचा सन्मान प्रशालेचे प्राचार्य, तसेच शिक्षक यांचे हस्ते आंब्याचे रोप देऊन सन्मान करण्यात आला तसेच प्रशालेत योग दिन साजरा केल्याबदल प्राचार्य यांचा सत्कार योग गुरु हरिभाऊ गोरे यांचे हस्ते करण्यात आला .
या प्रसंगी २०२३ च्या योग दिनाची थीम ' वसुधैव कुटुंबकम ' असून या दिनाचे महत्व सांगताना प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, २१ जून हा दिवस संपूर्ण विश्वभरात योग दिवस म्हणून साजारा केला जातो . निरोगी शरीर तसेच स्वस्थ मनासाठी योग अतिशय आवश्यक असून दररोज योग केल्यान शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते . सन २०१५ पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्थरावर साजरा केला जातो तसा प्रत्येक वर्षी आपणही आपल्या प्रशालेत साजरा करत असतो .
भारतीय संस्कृतीमध्ये योगाला खूप महत्त्व आहे आजच्या धावपळीच्या काळात सर्व विद्यार्थ्यांनी शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी भारतीय संस्कृतीची योग परंपरा जपली पाहिजे असा संदेश विद्यार्थ्यांना योगदिनी दिला .
या प्रसंगी तसेच योगप्रेमी यांच्यासह प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक - शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा