Breaking

रविवार, २३ जुलै, २०२३

माढा तालुक्यातील विविध ठिकाणच्या 11 रस्त्यांसाठी 14 कोटी 75 लाख निधी मंजूर. आमदार बबन दादा शिंदे्


माढा  तालुक्यातील विविध ठिकाणच्या 11 रस्त्यांसाठी 14 कोटी 75 लाख निधी मंजूर. 
                                 आमदार बबन दादा शिंदे्



बेंबळे। प्रतिनिधी  
                      राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजित दादा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांचे कडे पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेटून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघातील माढा तालुक्यातील विविध रस्त्यांचे दुरुस्ती व देखभाल कामासाठी जुलै,2023 चे पुरवणी अर्थसंकल्पात 14 कोटी 75 लाख निधीची तरतुद करण्यात आली असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे
 
याबाबत अधिक माहिती देताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की माढा विधानसभा मतदारसंघातील माढा तालुक्यातील 11 ठिकाणच्या रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी   जुलै,2023 चे पुरवणी अर्थसंकल्पात 14 कोटी 75 लाख निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात माढा तालुक्यातील  (1) निमगांव (टें) ते सापटणे (टें) रस्ता - 1.50 कोटी,  (2) लोंढेवाडी ते 5 वा मैल रस्ता (हाके वस्ती) - 1 कोटी, (3) वडशिंगे ते दारफळ रस्ता - 3 कोटी, (4) जाधववाडी ते रा.मा.141 रस्ता - 1 कोटी, (5) बैरागवाडी ते मोडनिंब-करकंब गावठाण रस्ता- 30 लाख, (6) वडाचीवाडी (अं.उ) ते गुळपोळी रस्ता -  70 लाख, (7) अंजनगांव ते तांबोळी वस्ती रस्ता - 2 कोटी , (8) दारफळ-माढा जोड रस्ता ते एकविरा आई मंदिर रस्ता - 50 लाख, (9) पिंपळनेर ते भुईंजे (रा.म.09) रस्ता - 3 कोटी, (10) टेंभुर्णी-बेंबळे चौधरी वस्ती ते झिरपे वस्ती रस्ता - 75 लाख, (11) चिंचोली ते सापटणे रस्ता - 1 कोटी, असा एकुण 14  कोटी 75 लाख निधी रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी मंजूर झालेला आहे.  
    माढा विधानसभा मतदारसंघातील उर्वरीत रस्त्यांच्या सुधारणेसाठी निधी मिळावा यासाठी  सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही आ.बबनराव शिंदे यांनी यावेळी सांगितले. सदर रस्त्याच्या कामामुळे वाड्यावस्त्या या गावच्या मुख्य रस्त्यांना जोडल्या जाणार असुन त्यामुळे दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा