Breaking

शनिवार, २२ जुलै, २०२३

टेंभुर्णी परिसरातील अवैध दारू मटका घेणाऱ्या वरती कारवाई*



टेंभुर्णी परिसरातील अवैध दारू मटका घेणाऱ्या वरती कारवाई


टेंभुर्णी प्रतिनिधी :-aj24Taas News Maharashtra 

टेंभुर्णी परिसरात अनेक दिवसापासून अवैध धंदे वाढले असून या धंद्यावरती कारवाई करण्यास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दमदार सुरुवात केली असून २२ जुलै रोजी टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध मटका, दारू विक्रेत्या वरती कारवाई करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले.
 टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील टेंभुर्णी शहर व परिसरात मध्ये खुलेआम मटका, दारूधंदे, जुगार चालू असल्याचे समजल्याने २२जुलै रोजी सकाळी दहा वाजले पासून संध्याकाळी ६:०० वाजे पर्यंत टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला  पोलीस उपनिरीक्षक मोनाली पवार , सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी ओमासे,कुलदीप सोनटक्के,  संदेश चंदनशिव यांनी टेंभुर्णी -पंढरपूर रोडवर असणाऱ्या परिते येथे अवैध चोरून दारू विकणारे नितीन विष्णू बाबर, तसेच टेंभुर्णी एमआयडीसी मध्ये चोरून दारू विकणारे बालाजी महारुद्र खटके, व टेंभुर्णी शहरात खुलेआम मटका घेणारे इसम विनोद मोहिते, जितेंद्र महेंद्र खरात, मोतीराम लोंढे, कन्हेरगाव सहित यांच्यावर कारवाई करून ७५१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आजच्या कारवाईमुळे टेंभुर्णी परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून ही कारवाई करण्यासाठी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर सरडे, संदीप गिरमकर, तुकाराम माने-देशमुख ,निखिल पवार, प्रसाद अनभुले,अतुल लवळे यांनी कारवाई केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा