Breaking

बुधवार, ५ जुलै, २०२३

80 वर्षाच्या महिलेच्या पोटातून काढली आठ किलो वजनाची गाठ...



    चोपडे हॉस्पिटलमध्ये 80 वर्षाच्या महिलेच्या पोटातून काढली आठ किलो वजनाची गाठ...


 बेंबळे। प्रतिनिधी।                     

             सविस्तर वृत्तांत असा की टेंभुर्णी येथील डॉक्टर विजयकुमार चोपडे यांच्या चोपडे हॉस्पिटलमध्ये, मूळची होळे तालुका माढा येथील रहिवासी असलेल्या व सध्या सोलापूर येथे स्थायिक झालेल्या कलावती कांबळे वय ८० या महिलेच्या पोटातून आठ किलो वजनाची मांसल गाठ काढण्यात येथील डॉक्टर मंडळींना यश आले आहे. कलावती कांबळे यांना त्यांच्या टेंभुर्णी येथील नातेवाईकांनी चोपडे हॉस्पिटलमध्ये पोट दुखी च्या कारणास्तव ऍडमिट केले होते. स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अमित चोपडे जनरल सर्जन डॉक्टर संजीव हेगडे यांनी सदर महिलेच्या तपासणीनंतर गर्भाशयानजीक गाठ असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांनी तात्काळ 3 जुलै रोजी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, यावेळी भूलतज्ञ डॉक्टर एकनाथ चंदनशिवे व मदतनीस सोमनाथ सांडगे यांनीही महत्त्वाचे सहकार्य केले .

 यशस्वी शस्त्रक्रिया नंतर काढलेल्या मौंसल गाठीचे वजन आठ किलो भरले असून पेशंट कलावती कांबळे यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टर अमित चोपडे यांनी सांगितले. गर्भाशया नजीक असलेल्या ओव्हरीजची ही गाठ तयार झाली असल्याचे डॉक्टरांच्या सांगण्यात आले . टेंभुर्णी येथे अशा प्रकारची ही पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया असून सर्व जनतेतून डॉक्टरांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा