Breaking

सोमवार, ३ जुलै, २०२३

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वारकऱ्यांना खिचडी वाटप



राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वारकऱ्यांना खिचडी वाटप


                                                     
  टेंभुर्णी (प्रतिनिधी) टेंभुर्णी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त मोफत खिचडी वाटपाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे टेंभुर्णी शहर अध्यक्ष ॲड. मंगेश देशमुख यांच्या वतीने पंढरपूरला पायी चालत जाणारे दोन हजार वारकऱ्यांना टेंभुर्णी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक करमाळा चौक येथे खिचडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
 टेंभुर्णी चे सरपंच प्रमोद कुटे यांच्या हस्ते वारकऱ्यांना खिचडी वाटप करण्यात आली यावेळी  टेंभुर्णी चे ज्येष्ठ नेते परमेश्वर मामा देशमुख, विलास काका देशमुख, बाळासाहेब कोठारी, ॲड .संतोष कानाडे,सापटणे ( टें) चे माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड, ईरा इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष वाकसे सर, श्रीकांत लोंढे, मुकुंद सुतार,
 राष्ट्रवादी युवक चे टेंभुर्णी सोशल मीडिया शहराध्यक्ष शंभुराजे  देशमुख, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य तानाजी येवले- पाटील, सोमनाथ देशमुख, मुन्ना देशमुख, नवनाथ जाधव,पप्पू मस्के,पिंटू देशमुख, हितेश देशमुख, वैभव देशमुख, पंकज देशमुख, आदी जण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा